Vastu Tips: मंगळवारी करा 'हे' ५ काम, करिअरमधील अडथळे दूर होतील अन् मिळेल यश

Vastu Tips: मंगळवार हा दिवस भगवान हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी काही काम केल्यास आयुष्यातील अडथळे कमी होऊ शकतात.
Vastu Tips
Vastu TipsSakal
Updated on

Vastu Tips For Mangalwar: भगवान हनुमानाचे नाव घेतल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते. परंतु जो हनुमान भक्त ज्येष्ठ महिन्यातील पहिल्या मंगळवारी हनुमानजींची सर्व विधीपूर्वक आणि मनोभावे पूजा करतो, त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. यासोबतच यशाच्या मार्गात येणारे अडथळेही दूर होतील.

ज्येष्ठ महिन्यातील पहिल्या मंगळवारला बडा मंगल किंवा बुधवा मंगल असेही म्हणतात. वास्तुशास्त्रानुसार बडा मंगललाही खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की बडा मंगलच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरात काही बदल केले तर तुमच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार बडा मंगलसाठी कोणते उपाय करावेत.

स्टडी टेबलजवळ उगवता सुर्य ठेवावा

सूर्यदेव हे हनुमानजींचे गुरु आहेत. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाचा फोटो लावल्याने हनुमानजींचा विशेष आशीर्वाद मिळतो. सूर्यदेव हा भाग्याचा ग्रह, नेतृत्व क्षमता आणि आत्मा मानला जातो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पयश हवे असेल तर तुम्ही सूर्यदेवाचा फोटो घरात किंवा अभ्यासाच्या टेबलाजवळ लावू शकता.

उत्तर दिशा योग्य

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या घरामध्ये भगवान हनुमानजींचा फोटो किंवा मूर्ती योग्य दिशेने ठेवली तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील. तसेच तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येईल, ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील.

पुजेच्या खोलीत लाल रंगाच्या वस्तू ठेवा

जर तुमच्या प्रगतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येत असतील तर फक्त मोठ्या मंगळवारीच नाही तर प्रत्येक मंगळवारी तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात लाल रंगाच्या वस्तू ठेवल्या पाहिजे. यामुळे तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर होईल. उदाहरणार्थ, मंदिरात लाल रंगाचा चोळा किंवा सिंदूरही ठेवू शकता.

Vastu Tips
Vastu Tips: 'या' दिशेला लावू नका नारळाचे झाड, वाढू शकतो कौटुबिंक त्रास

आवळ्याचे रोप घरी लावा

आज मंगळवार असून तुम्ही तुमच्या घरात आवळ्याचे रोप आणून लावू शकता. आवळ्याच्या रोपात भगवान विष्णू वास करतात. प्रभू राम हे विष्णूचे अवतार आहेत, म्हणून आवळा लावल्याने भगवान हनुमान आणि राम यांचा आशीर्वाद मिळतो. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात.

लाल सिंदूर लावा आणि पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवा

जर तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या कमी होत नसतील तर चांदीच्या नाण्यावर लाल सिंदूर लावा आणि 11 वेळा हनुमानजीच्या नावाचा जप करा आणि पर्समध्ये ठेवा. यामुळे तुम्हाला येणाऱ्या आर्थिक समस्या दूर होतील. तसेच करिअरमध्ये यश मिळेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.