Vastu Tips : घरी चुकूनही लावू नका ही रोपटी, प्रगतीत येईल अडथळे अन् व्हाल कंगाल
Vastu Tips : हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पती अत्यंत शुभ मानल्या जातात. असे मानले जाते की ही झाडे घरात लावल्याने सुख-समृद्धी आणि लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होते. पण घरात काही झाडे आणण्यासही सक्त मनाई आहे. वास्तुशास्त्रानुसार त्यांना घरी आणल्याने घरातील समृद्धी नष्ट होते, तसेच लक्ष्मी मातेचा तुमच्यावर कोप होतो. चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रात कोणती झाडे अशुभ मानली जातात, जी प्रत्येकाने घरात लावणे टाळावे.
घरात चुकूनही लावू नका ही रोपटी
वास्तुशास्त्रानुसार घराच्या आत आणि आजूबाजूला काटेरी झाडे कधीही लावू नयेत. काटेरी झाडे घरात तणावाचे वातावरण निर्माण करतात. ही झाडे घरात लावल्याने घरातील सदस्यांमधील मतभेद वाढतात.
घरात लावलेले कोणतेही रोप सुकत असेल तर ते लगेच काढून टाकावे. वास्तुशास्त्रानुसार घरातील झाडे सुकली की नकारात्मक ऊर्जा वाढते.
पिंपळाचे रोप दिव्य मानले जात असले तरी घरात लावणे शुभ नाही. या वनस्पतीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. असे मानले जाते की या झाडावर भूत आणि आत्मा राहतात. त्यामुळे याचा वापर घरात कधीही करू नये. घराच्या भिंतीवर किंवा कोपऱ्यात पिंपळाचे रोप उगवले असेल तर तेही काढून टाकावे. (Vastu Tips)
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये चिंचेचे झाड लावणे देखील खूप अशुभ आहे. हे झाड लावल्याने घरात नकारात्मकता येते. हे लावल्याने घरात नेहमी भीतीचे वातावरण असते. त्यामुळे चिंचेचे झाड घरात कधीही लावू नये. (Astrology)
वास्तुशास्त्रानुसार घरात कडुलिंबाचे झाडही लावू नये. असे मानले जाते की हे झाड घरामध्ये लावल्याने घरामध्ये नकारात्मकता निर्माण होऊ लागते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.