Vastu Tips : घरी असो किंवा बाहेर उलटे शूज-चप्पल कधीही ठेवू नये, असं आपण अनेकदा घरच्या वयोवृद्ध लोकांपासून ऐकलं असेल पण तुम्हाला माहिती आहे का उलटे शूज चप्पल ठेवल्याने काय होतं? का उलटे शूज चप्पल ठेवू नये.
वास्तू शास्त्रानुसार उलटे शूज चप्पल ठेवल्याने जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे चुकूनही कधी उलटे शूज चप्पल ठेवू नका. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेऊया. (Vastu Tips how to keep shoes and slippers at home )
उलटे शूज चप्पल ठेवल्याने घरातील शांती नष्ट होते. याशिवाय कारण नसताना घरात भांडणं होतात. ज्यामुळे घरातील सुख समृद्धी नष्ट होते.
जर तुम्हाला घरात उलटे शूज किंवा चप्पल दिसले तर त्याला त्वरीत सरळ करा. कारण यामुळे माता लक्ष्मी नाराज होते ज्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते आणि तुम्ही आर्थिक अडचणीत येतात.
घरात चुकूनही उलटे शूज चप्पल ठेवू नका. असं केल्याने घरात आजारपण वाढतं. घरातील लोक आजारी पडतात. याशिवाय घरात स्ट्रेसही वाढतो. त्यामुळे जर घरात चप्पल उलटी दिसत असेल तर त्वरीत सरळ करा.
असंही म्हणतात की घरात उलटे चप्पल जुते ठेवल्याने शनिदेव नाराज होतो. कारण शनिदेव हे पायांचे कारक मानले जाते. यामुळे नेहमी चप्पल जुते सरळ ठेवावे.
वास्तुशास्त्रानुसार चप्पल आणि शूज उलटे ठेवल्याने घरात नकारात्मक उर्जा येते. ज्याचा थेट परिणाम घरच्या सुख शांतीवर पडतो. गृहकलह निर्माण होण्याची शक्यता वाढते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.