हिंदू धर्मात कर्मकांडाला खूप महत्त्व आहे. जसे की पितरांच्या आत्म्याला शांती देणारे हे विधी नियमानुसार केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. परंतु काही वेळा पितृदोषामुळे मृत पूर्वज काही कारणाने कोपलेले राहतात.
जर तुमच्या घरातही अशा घटना घडत असतील तर समजून घ्या की तुमचे मृत पूर्वज कोणत्या तरी कारणाने तुमच्यावर रागावले आहेत. अशा विपरीत घडणाऱ्या घटनांची लक्षणे आपल्याला अनेकदा लवकर लक्षात येत नाहीत. चला मग आजच्या लेखात आपण हे समजून घेऊ या की, आपल्या आजुबाजुला कोणकोणत्या अशा घटना आहेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, या विषयी सविस्तर माहिती आणि उपाय पाहू या.
घराच्या परिसरात पिंपळाचे झाड उगले तर..
हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार घरात पिंपळाचे झाड उगवणे हे अशुभ लक्षण आहे. कोणाच्या घरी वारंवार पिंपळ उगवणे पितृ दोषाचे लक्षण असू शकते. असे होऊ शकते की तुमचे मृत पूर्वज तुमच्यावर रागावले आहेत आणि हे एक प्रकारे त्यांचा राग दर्शवत आहे.
अमावस्येच्या गरिबांना दान करावे. घराच्या परिसरात उगवलेले पिंपळ हे तुमच्यासाठी एक अशुभ लक्षण आहे. ज्यामुळे घरात कधीही वाईट गोष्टी घडू शकतात. म्हणजेच असे उगलेले झाड हे घरासाठी आणि तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवारी ते मुळासकट उपटून नदीत फेकून द्यावे. अमावस्येच्या दिवशी गरिबांना दान करावे. दानात काहीतरी गोड पदार्थ असावा करा. तुमच्या आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर गरिबांना पांढरे वस्त्र दान करा. त्यामुळे मृत पितरांची नाराजी कमी होईल.

सतत तुमच्या मनात अतिविचार येत असतील तर हलक्यात घेऊ नका.जर तुम्ही कोणत्याही एखाद्या विचारात हरवून जाऊन अतिविचार करण्याच्या समस्येशी झुंज देत असाल आणि तुम्हाला यात कुठेतरी अडकल्यासारखे वाटत असेल तर यावर शास्त्राचे अभ्यासक सांगतात की, विचार करणे ठीक आहे, परंतु उत्स्फूर्तपणे जास्त विचार करणे देखील तुम्हाला वेडे बनवू शकते. तुम्हाला असे वाटेल की जीवन थांबले आहे, तुम्हाला असे वाटेल की काहीही होत नाही. त्यामुळे तुम्ही आधी यातून बाहेर पडणे गरजेचे असते.
ज्योतिषशास्त्रानुसार अशा प्रकारची समस्या बिघडणाऱ्या चंद्रामुळे उद्भवते. अनियमित जीवनशैली हे तुमच्या राशीतील चंद्र बिघडण्याचे मुख्य कारण आहे. अशा व्यक्तींच्या कुंडलीत चंद्रदोष येतो. हे टाळण्याचा उपाय म्हणजे उजव्या हातात चांदीचे ब्रेसलेट घालणे आणि नियमितपणे पांढरे कपडे घालण्याचा प्रयत्न करणे. प्रत्येक सोमवारी शिवलिंगाला जल अर्पण करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.