Vastu Tips : 'हे' वास्तू नियम पाळत नाही म्हणून नवरा बायकोमध्ये होतं वारंवार भांडण

आपण काही वास्तू नियम पाळत नाही त्यामुळे अनेकदा घरात अशांतता, वाद, क्लेष निर्माण होत असतात
Vastu Tips for happy Family
Vastu Tips for happy Familysakal
Updated on

Vastu Tips : अनेकदा सर्वकाही व्यवस्थित असताना वैवाहीक आयुष्यात क्लेष निर्माण होत असतात मग यातूनच वाद, भांडणे होतात अन् मन अस्वस्थ होतं. कधी कधी आपण कुणाची दृष्ट लागली का? असाही प्रश्न निर्माण होतो.

अनेकांच्या घरी नवरा बायको वारंवार छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडत असतात त्यामुळे घरात अशांतता पसरते पण तुम्हाला माहिती आहे का आपण काही वास्तू नियम पाळत नाही त्यामुळे अनेकदा घरात अशांतता, वाद, क्लेष निर्माण होत असतात.

आज आपण ते वास्तू नियम कोणते, हे जाणून घेणार आहोत.(Vastu Tips if you dont follow these vastu rules husband wife dispute increase)

  • घराच्या उत्तर दिशेला निळा आणि जांभळा रंग असणे हे एक उत्तम वैवाहीक जीवनासाठी चांगलं लक्षण असतं.

  • घरात लाईट कलरचे डिम लॅम्प असणेही वैवाहीक आयुष्यासाठी चांगलं असतं.

  • कोणत्याही मेटलच्या बेडवर झोपू नये यामुळे पार्टनरसोबत क्लेष निर्माण होण्याची शक्यता असते.

  • काटेरी झाडे, झुडपे, रोपटे घरात आणि घराच्या आजुबाजूला चुकूनही लावू नये.

Vastu Tips for happy Family
Vastu Tips : शनिदोष सुरू झाला आहे? या रोपट्याने पडेल फरक!
  • बेडरुमला नेहमी लाईट आणि पेस्टल शेड कलर द्यावा. यामुळे घरात नेहमी चैतन्य आणि समृद्धी राहते.

  • जर तुमची बेडरुम आग्नेय (साउथ इस्ट) दिशेने असेल तर तुमच्या पार्टनरसोबत तुमची केमिस्ट्री अधिक खुलून उठू शकते.

  • याशिवाय तुमच्या घरातील किचेन जर आग्नेय (साउथ इस्ट) दिशेने असेल तर घरातील महिला स्ट्रॉंग असल्याचे हे प्रतिक असते.

  • घरात नेहमी डेकोर करताना कोणत्याही गोष्टींची पेअर लावा यामुळे तुमच्या जोडीदारावर तुमचं प्रेम वाढेल.

Vastu Tips for happy Family
Bedroom Decorating Ideas: या टिप्स फॉलो करा अन् घराला द्या हॉटेलचा लूक
  • नेहमी बेडरुमच्या पश्निम दिशेला तुमची आणि जोडीदाराची एकत्र फोटो लावा.

  • बेडरुममध्ये चुकूनही देवांची फोटो लावू नका, यामुळे वैवाहीक जीवनात वाद होण्याची शक्यता असते.

  • बेडच्या समोर कधी आरसा लावू नका याशिवाय जितका मोठा आरसा राहणार तितके जास्त क्लेष होणार.

  • घरात देवघर नेहमी ईशान्य म्हणजेच नॉर्थ इस्ट दिशेला हवं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.