Kitchen Hacks : स्वयंपाकघरातील या वस्तूंमुळे चमकेल तुमचं नशीब, श्रीमंत व्हायचं असेल तर आजचा करा हे उपाय

वास्तू शास्त्राच्या नियमांनुसार स्वयंपाकघरातच Kitchen असलेल्या काही साधारण वस्तूंमुळे तुमच्या घरात सुख शांती नांदण्यासोबत तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होवू शकते
किचन आणि समृद्धी
किचन आणि समृद्धीEsakal
Updated on

घरामध्ये सुख शांती रहावी आणि घरातील व्यक्तींची भरभराट व्हावी अशी प्रत्येकाती इच्छा असते. तसंच घरात कायम धनलाभ व्हावा यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करत असतात. पण तुम्हाला माहिक आहे का तुमच्या किचनमधील काही वस्तू तुमच्या आर्थिक समस्या दूर करून तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. Vastu Tips in Marathi kitchen arrangement for positive energy

वास्तू शास्त्राच्या नियमांनुसार स्वयंपाकघरातच Kitchen असलेल्या काही साधारण वस्तूंमुळे तुमच्या घरात सुख शांती नांदण्यासोबत तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होवू शकते. तुमच्या घरात सकारात्मक Positive Energy वातावरण निर्माण व्हावं यासाठी तुम्ही हा वस्तूंचा वास्तूच्या नियमांनुसार वापर करू शकता.

या वस्तू कोणत्या आणि त्याचा कसा वापर करावा याबद्दल जाणून घेऊयात

हळद- स्वयंपाकाची चव वाढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हळदीला वास्तू शास्त्रातच नव्हे तर आयुर्वेदातही महत्वाचं स्थान आहे. अनेक शुभ कार्यासाठी हळद वापरली जाते. जर तुमच्या घरामध्ये, व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या असतील तर सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद मिसळून या हळदीच्या पाण्याने आंघोळ केल्यास अनेक समस्या दूर होतील.

या शिवाय काही तांदूळ घेऊन त्यात हळद टाकावी. हळदीचे हे तांदूळ एका लाल रंगाच्या कापडात बांधून ही पूडी पर्समध्ये ठेवावी. यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील.

तसंच गुरवारच्या दिवशी भगवान विष्णूंना हळद अर्पण करणं शुभ मानलं जातं. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरामध्ये समृद्धी नांदते. तसचं मुख्य दरवाज्यामध्ये हळदीचं पाणी शिंपडल्यास घरातील समस्या दूर होतात. तसचं घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते.

हे देखिल वाचा-

किचन आणि समृद्धी
Kitchen Hacks: सकाळी स्वयंपाकाची घाई होतेय? मग या टिप्स वापरा आणि लवकर आवरा

लसूण- स्वयंपाक घरात असणारा आणखी एक महत्वाचा पदार्थ म्हणजे लसूण. पदार्थ रुचकर होण्यासाठी वापरण्यात येणारा लसूण तुमच्या घरातील अनेक अडचणी दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. वास्तू शास्त्रानुसार घराच्या मुख्य दाराजवळ लसूण बांधल्यास घरातमध्ये नकारात्मक शक्ती शिरत नाहीत.

जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर तुम्ही लसणाच्या १-२ पाकळ्या आणि १-२ लंवग एका लाल कापडामध्ये बांधून हे कापड तिजोरीमध्ये ठेवल्यास घरातील आर्थिक स्थिती चांगली राहते. शनिवारी हा उपाय केल्यास घरात पैश्यांची कमतरता निर्माण होणार नाही.

तसंच धनलाभ व्हावा किंवा पैसा आकर्षित करण्यासाठी एका नव्या पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये २-३ लसाणाच्या पाकळ्या, हळकुंड आणि थोडे तांदूळ बांधुन तिजोरीमध्ये ठेवल्याने धनलाभ होईल.

नारळ- नारळ हा केवळ स्वयंपाकासाठीच नव्हे तर हिंदू धर्मात अनेक शुभ कार्यासाठी नारळ वापरला जातो. हिंदू धर्मात नारळाला श्रीफळ म्हंटलं जातं. त्यामुळे वास्तूशास्त्रातहबी नारळाचा महत्वाचं स्थान आहे. जर तुमच्या घरात संपत्ती टिकत नसेल किंवा पैशांची सतत कमतरता भासत असेल तर तुम्ही वास्तू शास्त्राप्रमाणे एक उपाय नक्की करून पाहू शकता.

यासाठी सर्वप्रथम धनाची देवी असलेल्या लक्ष्मी मातेला एका नारळासोबत कमळाचं फूल, पांढरे कापड आणि मिठाई अर्पण करून आशीर्वाद घ्या. त्यानंतर हा नारळ एका लाल रंगाच्या कापडामध्ये गुंडाळून घरामध्ये कुणाला दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा. यामुळे पैशांसंबधीच्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल.

अशा प्रकारे किचनमधील या वस्तूंच्या मदतीने तुम्ही घरातील अनेक समस्या दूर करू शकता.

टीप - ही माहिती सर्वसाधारण गृहितकांवर आधारित आहे. यात अंधश्रद्धेला पाठिंबा देण्याचा कुठलाही हेतू नाही.

हे देखिल वाचा-

किचन आणि समृद्धी
Kitchen Tips : दुष्काळात तेरावा महिना! महाग झालेले टोमॅटो पावसाळ्यात होतायत खराब; अशी करा साठवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()