Stress Free राहण्यासाठी वास्तू शास्त्रातील हे नियम येतील उपयोगी

घरातील वाद दूर करण्यापासून ते पैशांची तंगी दूर करून धनलाभासाठी वास्तू शास्त्रामध्ये उपाय सांगण्यात आले आहे. जाणून घ्या त्याबद्दल
ताणापासून मुक्ती
ताणापासून मुक्तीEsakal
Updated on

हिंदू धर्मामध्ये वास्तू शास्त्राला महत्वाचं स्थान देण्यात आलं आहे. महाल, घर किंवा मंदिर बांधण असो तसंच कोणतीही वास्तू बांधण्यासाठी वास्तू शास्त्राच्या Vastu Shastra नियमांचं पूर्वापार पालन केलं जात आहे. Vastu Tips Marathi know how to tackle with tensions in home

तसंच घरातील खोल्यांची दिशा किंवा घरात कोणत् वस्तू कुठे ठेवाव्यात जेणेकरून जीवनातील समस्या Problems कमी होवून घरात सुख-समृद्धी नांदेल याबद्दल वास्तू शास्त्रामध्ये Vastu Tips अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वास्तू शास्त्रातील अनेक सोप्या आणि सहज करता येण्यासारख्या उपायांनी देखील अनेक समस्या दूर होवू शकतात.

घरातील वाद दूर करण्यापासून ते पैशांची तंगी Financial Problems दूर करून धनलाभासाठी वास्तू शास्त्रामध्ये उपाय सांगण्यात आले आहे. सध्याच्या काळामध्ये अनेकांना भेडसावणारी एक समस्या म्हणजे तणाव.

विविध कारणांमुळे अनेकजण सतत तणावात असतात. पैसा असला तरी अनेकदा नात्यांमध्ये दुरावा असतो. नाती, प्रेम असलं तर आर्थिक अडचणी असतात. तसंच अनेक गोष्टींच्या तणावाखाली अनेकजण जीवन जगत असतात. हा तणाव दूर करण्यासाठी देखील वास्तू शास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास तुमचा ताण दूर होवून तुम्ही आयुष्यातील प्रत्येक क्षण एन्जॉय करू शकाल.

झोपण्याची दिशा

वास्तू शास्त्रानुसार झोपण्यासाठी योग्य दिशा निवडणं गरजेचं आहे. वास्तूनुसार दक्षिण किंवा पूर्वेस डोक करून झोपण्याचा सल्ला दिला जातो. झोपताना चुकूनही डोकं उत्तरेस करू नका. अन्यथा तुम्हाला मानसिक समस्यांचा सामना करावा लागेल.

जर तुम्हाला शांत झोप हवी असेल आणि मानसिक तणाव दूर करायचा असेल तर झोपताना दिशा जाणून घ्या आणि त्यातूसारच तुमचा बेड किंवा झोपण्याची सोय करा.

हे देखिल वाचा-

ताणापासून मुक्ती
Vastu Tips : घरात लाल रंगाच्या वस्तू कुठेही ठेऊ नका, आधी वास्तूचा हा नियम वाचा

बेडरूममध्ये या वस्तू ठेवू नका

वास्तू शास्त्रानुसार बेडरुममध्ये चुकूनही आरसा किंवा ड्रेसिंग टेबल ठेवू नका. जर तुम्हा इतर ठिकाणी सोय नसल्याने आरसा किंवा ड्रेसिंग टेबल बेडरुममध्येच ठेवावं लागत असेल तर आरशावर पडदा लावा. वापर झाल्यावर आरसा झाकून ठेवा.

त्याचप्रमाणे अलिकडे अनेकजण बेडरूममध्ये देखील टीव्ही ठेवतात. मात्र वास्तू शास्त्रानुसार जर तुम्हाला तणावाचा सामना करावा लागत असेल तर बेडरुममध्ये टीव्ही ठेवू नका.

घराच्या अंगणाची घ्या काळजी

घरासमोरील अंगण हे कधीही खराब अवस्थेत नसावं. अंगणामध्ये कचरा किंवा घरातील मोडक्या वस्तू ठेवू नयेत. वास्तू शास्त्रानुसार घरासमोरील अंगणात भंगार किंवा कचरा असेल तर घरातले लोक मानसिक दबावात राहतात.

तसंच घरामध्ये बिघडलेल्या वस्तू आणि बंद किंवा खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढून मानसिक तणाव वाढून कुटुंबात कलह निर्माण होतात.

घराचे दरवाजे असे असावे

वास्तू शास्त्रानुसार घराची दारं एकमेकांसमोर नसावीत. वास्तू शास्त्रानुसार हा एक मोठा वास्तू दोष मानला जातो. यामुळे घरातील लोकांच्या आर्थिक समस्या वाढू लागतात आणि तणाव वाढतो.

वास्तूशास्त्रातील इतर महत्वाचे नियम

वास्तू शास्त्रानुसार घरातील भिंतींचा रंग गडद नसावा. याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो आणि तणाव वाढू लागतो यासाठी घराच्या भिंती फिक्या रंगाच्या असाव्या.

घरात कोणत्याही प्रकारचं हिंसक प्राण्याचं किंवा इतर हिंसक पेंटिग किंवा फोटो नसावा.

तसंच कोणत्याही देव-देवतेचं हिंसक रुपातील फोटो किंवा पेंटिग घरात लावू नये. अन्यथा तणाव वाढू शकतो.

वास्तू शास्त्रातील या नियमांचं पालन केल्यास तणाव कमी होण्यास मदत होईल.

टीप- हा लेख वास्तूशास्त्रात सांगितलेल्या गृहितकांवर आधारित आहे. यात अंधश्रद्धेला पाठिंबा देण्याचा कुठलाही हेतू नाही.

हे देखिल वाचा-

ताणापासून मुक्ती
Vastu Tips: घरात ठेवा हत्तीची जोडी, Love Life होईल रोमॅण्टिक आणि पैशांची तंगी देखील होईल दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.