Vastu Tips: लहान मुलांच्या खोलीत 'या' वस्तू वाढवतात नकारात्मकता, आजच काढा बाहेर

Vastu Tips: अनेक पालक आपल्या मुलांची खोली सजवताना विविध गोष्टी लक्षात ठेवतात. पण कोणत्या गोष्टी ठेवणे टाळले पाहिजे हे जाणून घेऊया.
Vastu Tips
Vastu TipsSakal
Updated on

Vastu Tips: घराचे बांधताना करताना वास्तूच्या काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. वास्तूनुसार लहान मुलांची खोली असो किंवा घरातील इतरा कोपरा, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम असतात. त्यांचे पालन करणे देखील आवश्यक असते . अन्यथा मुलांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

जर तुम्ही घरात लहान मुलांची खोली तयार करत असाल किंवा डिझाइन करत असाल तर चुकूनही पुढील गोष्टी ठेऊ नका किंवा असेल तर आजच काढून टाका.

या गोष्टी मुलांच्या खोलीत ठेवू नका

झाड

मुलांच्या खोलीमध्ये रोपे लावू नका. अनेक वनस्पती अशा असतात आणि मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात. म्हणूनच रोपे मुलांच्या खोल्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच मुलांना तीक्ष्ण किंवा ऍलर्जी असलेल्या वनस्पतींपासून दूर ठेवा.

टीव्ही

मुलांच्या खोलीत टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवू नका. जर तुमच्या मुलाच्या खोलीत टीव्ही लावला असेल तर तो ताबडतोब काढून टाका. कारण खोलीत टीव्ही असल्यामुळे मुलांचे लक्ष बहुतेक टीव्हीवरच राहते.

मोबाईल

मुले रात्री झोपतात तेव्हा टॅब आणि मोबाईल फोन खोलीबाहेर ठेवा. त्यांची ऊर्जा मुलांसाठी चांगली नसते.तसेच ते शांत झापू शकतात.

आरसा

मुलांच्या खोलीत आरसा लावू नये. जर तुमच्या मुलाच्या खोलीत आरसा असेल तर तो ताबडतोब काढून टाका. मिररचे नकारात्मक प्रभाव आहेत.

Vastu Tips
Vastu Tips: 'या' दिशेला लावू नका नारळाचे झाड, वाढू शकतो कौटुबिंक त्रास

कोणता रंग वापरावा

वास्तूनुसार मुलांच्या खोलीला नेहमी हलका रंग द्यावा. हलका रंग आनंदादायी असतात. तुम्ही हिरवा, निळा, पिवळा जांभळा देऊ शकता.

हिंसक पोस्टर

मुलांच्या खोलीत मारामारीचे पोस्टर असतील तर ते काढून टाकावे. अशा पोस्टर्सचा मुलांवर नकारात्मक परिणाम होतो. मुलांच्या खोलीत नेहमी अभ्यासाशी संबंधित गोष्टींचे पोस्टर्स किंवा जीवनातील प्रेरणादायी कोट्स लावा.

स्वच्छता

मुलांना त्यांची खोली स्वच्छ ठेवण्यास शिकवावे. त्यांचे पुस्कक, कपडे नीट ठेवण्यास शिकवावे. यामुळे मोठे झाल्यावर घराबाहेर गेल्यावर स्वत:च्या वस्तू नीट ठेवण्याची सवय लागते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.