Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेच्या दिवशी 'या' गोष्टींचे करा दान, फळफळेल तुमचे नशीब..!

Vat Purnima 2024 : आज सर्वत्र वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळत आहे.
Vat Purnima 2024
Vat Purnima 2024 esakal
Updated on

Vat Purnima 2024 : आज सर्वत्र वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळत आहे. हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमा सणाचे विशेष महत्व आहे. आजच्या दिवशी सूवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीचे व्रत करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात.

धार्मिक मान्यतेनुसार, आजच्या दिवशी हे व्रत केल्याने विवाहित महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. तसेच, या दिवशी नकळत झालेल्या चुकांपासून ही मुक्ती मिळू शकते, असे ही सांगितले जाते.

आजच्या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचे खास महत्व आहे. या दिवशी अनेक शुभ योग ही घडत असतात. आजच्या दिवशी दान करणे, शुभ मानले जाते. ज्यामुळे, विवाहित महिलांचे भाग्य उजळू शकते. आज आम्ही तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे? त्याबद्दल सांगणार आहोत.

अन्न

वटपौर्णिमेच्या दिवशी अन्नदान करणे अतिशय शुभ आणि पुण्याचे मानले जाते. अन्नदान केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आपल्यावर विशेष कृपा होते, असे मानले जाते. विशेष म्हणजे वटपौर्णिमेला अन्नदान केल्याने पापांचा नाश होतो आणि मन शुद्ध होते. तसेच, ग्रहांचे दोष दूर होतात आणि शुभफळ प्राप्त होते, असे सांगितले जाते. त्यामुळे, आजच्या दिवशी अन्नदान करायला विसरू नका.

वस्त्र

वटपौर्णिमेच्या दिवशी वस्त्रदान अवश्य करावे. आजच्या दिवशी वस्त्रदान करणे, अतिशय शुभ मानले जाते. शिवाय, वस्त्रदान केल्याने व्यक्तीला कधीही धनाची कमी पडत नाही, अशी देखील धारणा आहे. तसेच, जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही. त्यामुळे, आजच्या दिवशी वस्त्रदान करण्याचा सल्ला दिला जातो.

पाणी

पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याला अमृत देखील म्हटले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी जलदान करणे हे सर्वात श्रेष्ठदान मानले जाते. त्यामुळे, आजच्या दिवशी विशेषत: पाण्याचे दान करावे. यामुळे, एखाद्या व्यक्तीची तहान भागू शकते आणि ती व्यक्ती समाधानी राहू शकते. याचे तुम्हाला नक्कीच शुभ परिणाम दिसू शकतील.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com