Astrology : पायात काळा धागा बांधणं फक्त फॅशन नव्हे; 'हे' आहेत फायदे व नियम

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की लोक त्यांच्या पायाला आणि हाताला काळे धागे बांधतात.
Black Thread
Black ThreadSakal
Updated on

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की लोक त्यांच्या पायाला आणि हाताला काळे धागे बांधतात. आता खरंतर ही फॅशन झाली आहे. पण काळा धागा ही फॅशन नसून ती वाईट नजर घालवण्यासाठी पायाला बांधली जाते. याशिवाय काळ्या धाग्यामुळे अनेक फायदे होतात. शास्त्राचे जाणकार सांगतात की, काळा धागा धारण केल्याने कुंडलीत शनी बलवान होतो आणि शनिदोषापासून मुक्ती मिळते.

काय आहेत याचे फायदे?

1. ज्या हाताला किंवा पायात काळा धागा बांधला असेल, त्या हातात दुसरा रंगाचा धागा बांधू नये. जेव्हा तुम्ही काळा धागा बांधाल तेव्हा त्यात ९ गाठी बांधा.

2. काळा धागा बांधताना शुभ मुहूर्ताची काळजी घ्यावी. यासाठी तुम्हाला ज्योतिषाशी संपर्क साधावा लागेल. काळा धागा वाईट नजरेपासून रक्षण करतो आणि जीवनातील समस्या दूर करतो.

Black Thread
Astro Tips : गंगा दसर्‍याला जुळून येतोय अतिशय शुभ योग, एकाच वेळी 10 हजार पापांतून मिळेल मुक्ती

3. घरातील कोणताही सदस्य किंवा मूल वारंवार आजारी पडत असेल आणि त्याचा आजार औषधाने बरा होत नसेल तर त्याच्या कंबरेला काळा दोरा बांधावा. यामुळे मुलाचे आजार बरे होतील आणि उपचाराचा फायदा होईल.

Black Thread
Astro Tips : पत्नीने पतीच्या डाव्याबाजूस का झोपावे? जाणून घ्या फायदे

4. जेव्हाही तुम्ही काळा धागा घालाल त्यानंतर रोज गायत्री मंत्राचा जप करावा. घराच्या दारावर काळ्या धाग्यात लिंबू आणि मिरची लटकवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा पसरते.

5. जर तुमच्या मुलाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असेल तर मुलाच्या पायावर काळा धागा बांधा, असं केल्यानं बाळ कमी आजारी पडेल.

वरील माहिती सामान्य गृहितकांवर आधारीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.