Sade Sati : साडेसाती म्हणजे काय?

हिंदू धर्मात ज्योतिष, पंचांग, राशी यांना अनन्य साधारण महत्त्व आहे.
Sade Sati
Sade SatiSakal
Updated on

सौ. कानन माधव काकरे

( ज्योतिष तज्ञ आणि टॅरोट कार्ड रीडर)

What Is Sade Sati : हिंदू धर्मात ज्योतिष, पंचांग, राशी यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्योतिष आणि भविष्यावर श्रद्धा असणारी माणसं योग, ग्रह, साडेसाती आदींची माहिती वारंवार घेत असतात. प्रत्येक राशीला आयुष्यात एकदातरी साडेसातीला सामोरे जावे लागते. साडेसाती हा एक अडचणींचा आणि समस्यांचा काळ समजला जातो. यासाठी शनी दोषी आहे, असे समजले जाते. आज आपण साडेसाती म्हणजे नेमकं काय? याबद्दल जाणून घेणार आहोत.

Sade Sati
Ravan Shani Dev Katha : रावणामुळे शनिदेवाची साडेसाती अडीच वर्ष भोगावी लागते; जाणून घ्या कथा
Shani Jayanti
Shani Jayanti

जेव्हा जातकाच्या जन्म राशीच्या किंवा चंद्र राशीच्या बाराव्या स्थानात शनि महाराज प्रवेश करतात तेव्हा त्या राशीला किंवा जातकाला साडेसाती चालू झाली आहे असे म्हणतात. शनि महाराज प्रथमता बाराव्या स्थानात अडीच वर्ष नंतर प्रथम स्थानात चंद्राबरोबर अडीच वर्ष नंतर त्यांना अडीच वर्ष असतात. याला साडेसाती असे म्हणतात.

Sade Sati
Shani Jayanti 2022 : शनि महादशा, साडेसाती असलेल्यांनी कराने हे उपाय
Tension
TensionTension

साडेसातीत नेमके काय होते ?

प्रत्येक जणांच्या मनात साडेसाती म्हटलं की भीती निर्माण होते. आता आपले साडेसातीत कसं होणार आपल्याला भरपूर अडचणी येणार परंतु साडेसाती म्हणजे विलंब. या कालावधीत आपल्या प्रत्येक गोष्टीला विलंब लागत असतो. आपल्याला माहिती आहे की, उद्या आपलं काम होणार आहे परंतु, साडेसातीत याच गोष्टीला महीना किंवा एक दीड वर्षही लागू शकतो.

Sade Sati
Kaala Dhaga : सावधान! 'या' राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये काळा धागा; फायद्याऐवजी होईल नुकसान

साडेसाती म्हणजे शनि महाराजांनी घेतलेली माणसाची परीक्षा होय. आपल्या हातात कुठलेही काम पटकन न येणे किंवा हातातील कामं दुसऱ्या व्यक्तीला जाणे अशा तत्सम गोष्टींचा समावेश यात होतो. याच कारणांमुळे जातकाच्या मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य आणि आर्थिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. अशारितीने त्या जातकाचा माणसावर आणि देवावरचा विश्वास संपुष्टात येतो आणि यामुळे व्यक्ती प्रचंड प्रमाणात हातबल होते. शनि महाराज या साडेसातीत आपलं कोण आणि परक कोण हे दाखवून देत असतात आणि याच काळामध्ये आपल्या आणि परक्या माणसांची ओळख पटते.

Sade Sati
Astro Tips : आजार बरा होण्याचं नावचं घेत नाहीये? स्मशानभूमीतले हे उपाय करतील मदत

साडेसातीचा कालावधी किती असतो ?

जरी लोकांना वाटत असेल की, साडेसाती ही साडेसात वर्षाचे असते परंतु, तसे नाही. कारण शनि महाराजांना एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करायला साधारणतः अडीच वर्षांचा कालावधी लागतो. परंतु शनि वक्री झाला तर, हाच कालावधी लांबला जातो मग हीच साडेसाती कधी नऊ वर्ष कधी साडेदहा वर्ष कधी अकरा वर्षांचा कालावधी पण घेते.

वरील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.