Surya Chandra Grahan : वर्षातलं शेवटचं सूर्य अन् चंद्र ग्रहण कधी? यादिवशी चुकूनही करू नका ही कामं

ऑक्टोबरचे सूर्यग्रहण अश्विन अमावस्येला होणार आहे. तर अश्विन पौर्णिमेला चंद्रग्रहण दिसणार आहे.
Surya Chandra Grahan
Surya Chandra Grahan esakal
Updated on

Surya Chandra Grahan : या वर्षातील पहिले सूर्य आणि चंद्रग्रहण यापूर्वीच झाले आहे. आता वर्षातील दुसरे ग्रहण येणार आहे. ज्योतिषांच्या मते, वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्य-चंद्रग्रहण ऑक्टोबरमध्ये होणार आहे. दोन्ही ग्रहणांमध्ये 15 दिवसांचे अंतर असेल. ऑक्टोबरचे सूर्यग्रहण अश्विन अमावस्येला होणार आहे. तर अश्विन पौर्णिमेला चंद्रग्रहण दिसणार आहे. दोन्ही ग्रहण केव्हा आणि कोणत्या शुभ मुहूर्तावर होतील ते जाणून घेऊया. यासोबतच त्या काळात सुतक काळ असेल की नाही तेही जाणून घेऊया.

कधी आहे वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण

धार्मिक विद्वानांच्या मते, या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर रोजी रात्री 8.34 वाजता सुरू होईल. हे ग्रहण सुमारे 6 तासांनंतर 15 ऑक्टोबर रोजी पहाटे 2.25 मिनिटांनी संपेल. विशेष म्हणजे हे सूर्यग्रहण कन्या आणि चित्रा नक्षत्रात होणार आहे. विशेष म्हणजे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणजे भारतात सुतक काळ असणार नाही. हे ग्रहण ब्राझील, कॅनडा, अमेरिका, जमैका, क्युबा, मेक्सिको, इक्वेडोर, ग्वाटेमाला, पॅराग्वेसह अनेक देशांमध्ये दिसणार आहे.

या दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असेल

आता या वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाबद्दल सांगायचे झाल्यास हे चंद्रग्रहण २९ ऑक्टोबर रोजी पहाटे १:०६ ते २:२२ पर्यंत राहील. हे ग्रहण भारतात पाहता येणार आहे. त्याचा कालावधी 1 तास 16 मिनिटे असेल. याला खंडग्रास चंद्रग्रहण म्हटले जाईल. (Lunar Eclipse)

Surya Chandra Grahan
Surya Grahan 2023 : ग्रहण संपताच लगेच उरका ही कामं, घरात कधीच राहाणार नाही नकारात्मक शक्तींचा वास

भारतातही सुतक काळ असेल का?

ज्योतिषांच्या मते, 29 ऑक्टोबर रोजी चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी, म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.52 वाजता, भारतात सुतक कालावधी सुरू होईल. रात्री उशिरा चंद्रग्रहण संपेल तेव्हाच सुतक कालावधी संपेल. या प्रकारच्या सुतक काळात अनेक शुभ कार्ये करण्यास मनाई आहे. या काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. (sanskruti)

Surya Chandra Grahan
Chandra Grahan : सावधान! चंद्रग्रहणाचा 'या' पाच राशींवर अशुभ प्रभाव, तुमची रास यात आहे का?

सुतक काळात चुकूनही हे काम करू नका

सुतक कालावधी चालू असताना गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. या दरम्यान, झोपणे देखील चुकीचे आहे. मात्र आजारी लोक आराम करू शकतात. सुतक काळात जेवणे किंवा अन्न शिजवणे टाळा. सुतक काळात मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात. या काळात पूजाही केली जात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.