Raksha Bandhan 2022 : भद्रा काळ म्हणजे काय, या चार राशींवर अधिक प्रभाव

Raksha Bandhan Bhadra Kal
Raksha Bandhan Bhadra Kal esakal
Updated on

रक्षाबंधन सण साजरे करताना जेव्हा आपण कॅलेंडर मध्ये तिथी पाहतो त्यावेळी थोडासा संभ्रम निर्माण होतो.

पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा तिथी 11 ऑगस्टला सकाळी 10 वाजून 38 मिनीटांनी सुरू होणार असून 12 ऑगस्टला सकाळी 7 वाजून 05 मिनिटांपर्यंत आहे. याविषयी ज्योतिष सांगतात, 11 तारखेला भद्रा काळ हा रात्री 8.51 वाजेपर्यंत आहे.

मकर राशीत चंद्र असल्याने पाताळात जाऊन यावेळी भद्रा समाप्त होईल. आणि भद्रा काळाचा दोष राहणार नाही. भद्रा काळ म्हणजे नेमकं काय? हा काळ कधी कधी येतो? कुठल्या राशींवर भद्रा काळाचा विशेष प्रभाव असतो व यावर उपाय काय हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. (Who is Bhadrakal why Rakhi not tied best time muhurat astrology rashi)

या वेळेला म्हणतात भद्रा काळ

हिंदू धर्मात भद्रा काळाला अशुभ वेळ मानली जाते. त्यामुळे या वेळेत कुठलेही शुभ कार्य केले जात नाहीत. या वेळेत शुभ कार्य केल्यास त्याचे अशुभ परिणाम समोर येण्याची शक्यता असते. कुठलंही शुभ कार्य करताना पंचांग पाहिले जाते.

पंचांगाचे पाच अंग असतात. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. तिथीच्या पहिल्या निम्म्या भागाला प्रथम करण उर्वरित भागाला द्वितीय करण असे म्हणतात. एका तिथीमध्ये दोन करण येतात. जेव्हा तिथीचा विचार केला जातो त्यावेळी त्यात विष्टी नावाचे करण येते. आणि या वेष्टी करण असणाऱ्या समयाला भद्रा योग तथा भद्रा काळ असे म्हणतात. कश्यप ऋषींनी भद्रा काळ हा अशुभ आणि दुखदायी आहे असे सांगितले आहे.

कश्यप ऋषी सांगतात,

न कुर्यात मंगल विष्ट्या जीवितार्थी कदाचन |

कुर्वन अज्ञस्तदा क्षिप्र तत्सर्वंन नाशतं व्रजेत ||

अर्थात जो व्यक्ती आपले सुखमय जीवन व्यतीत करु इच्छितो त्याने भद्रा काळात कुठलेही मंगल कार्य करू नये. केल्यास त्याचे अशुभ फळ प्राप्त होते.

यावेळेत असतो भद्रा

मराठी कॅलेंडर प्रमाणे प्रत्येक महिन्यात दोन पक्ष येतात. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षात चार वेळा भद्रा योगाची पुनरावृत्ती होते. जसे की अष्टमी आणि पौर्णिमाच्या पूर्वार्धाला भद्रा योगाची दृष्टी असते. त्याचप्रमाणे चतुर्थी आणि एकादशीच्या उत्तरार्धात भद्रा दृष्टी असते. तसेच सप्तमी आणि चतुर्दशीच्या पूर्वार्धाला भद्रा असतो.

भद्रा काळात कोणती कार्ये करावी..

भद्रा काळात कुठलीही शुभ कार्ये करू नये. आपल्यावर एखादा खटला सुरू असल्यास त्याविषयी कार्यवाहीसाठी भद्रा काळ ही योग्य वेळ मानली जाते. याचसोबत शस्त्रक्रिया, अग्नी कार्य, विवाद संबंधी कामे, शस्त्र संबधी कामे यावेळी करावी.

भद्रा काळात कोणती कामे करू नये...

हा काळ अशुभ मानला गेल्याने यावेळेत विवाह, मुंज, वास्तुशांती, गृह प्रवेश यांसारखे शुभ कर्म करू नये. तसेच कुठल्याही नवीन कार्याचा, व्यवसायाचा शुभारंभ करु नये. यावेळी ही कार्ये केल्यास त्याचे फळ प्राप्त होणार नाही.

Raksha Bandhan Bhadra Kal
Raksha Bandhan 2023: सुतक पडलेले असताना रक्षाबंधन करावे का? बघू या काय सांगते शास्त्र

या राशींवर आहे भद्रा काळाचा अधिक प्रभाव...

पंचांगानुसार प्रत्येक राशीच्या माध्यमातून भद्रा तिन्ही लोकांत भ्रमण करत असते. जेव्हा भद्रा पृथ्वी (मृत्यू लोक) वर येते त्यावेळी शुभ कर्मे वर्ज करावी. मात्र हाच भद्रा जेव्हा स्वर्ग आणि पाताळ लोकांत असेल तेव्हा शुभ फळ देणारा आहे असे सांगितले जाते.

चंद्र जेव्हा कर्क, सिंह, कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा तो पृथ्वीवर वास करतो. जेव्हा चंद्रमा मेष, वृषभ, मिथुन आणि वृश्चिक राशीत असतो तेव्हा स्वर्ग लोकांत असतो. तर कन्या, धनु, आणि मकर असतो त्यावेळी तो पाताळ लोकांत असतो. भद्रा जेव्हा ज्या लोकात असेल त्यावेळी तेथे प्रभावी असतो. यावर्षीच्या पौर्णिमेला चंद्र मकर राशीत असल्याने भद्रा पाताळ लोकात आहे. त्यामुळे ज्योतिष सांगतात की रक्षाबंधन हा सण 11 ऑगस्टला साजरा करावा.

पंचांगानुसार चंद्र जेव्हा मेष, वृषभ, मिथुन, कन्या, तुळा, वृश्चिक, धनु, आणि मकर राशीत असताना शुभ फळ प्रदान करणारी असते असे मानले जाते.

शनी देवाची बहीण आहे भद्रा

पौराणिक कथेच्या अनुसार भद्र हे सूर्य ची कन्या आणि शनी देवाची बहीण आहे असे मानले जाते. भविष्यपुराणानुसार भद्राचे स्वरूप हे अतिशय भयावह असे आहे. त्याच्या उग्र स्वभावामुळे त्यांना ब्रम्ह देवाने सृष्टीच्या कालगणनेत स्थान दिले आहे. ब्रम्हदेव सांगतात भद्राच्या काळात जो कोणी शुभ कार्य करेन त्याला भद्रा त्रास देऊन त्यांच्या कार्यात अडचणी आणि विघ्ने आणेल.

भद्रा काळाचे दुष्परिणाम टाळण्याचे उपाय

ज्योतिष शास्त्रात भद्रा योगाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काही उपाय सांगितले आहे. यानुसार सकाळी लवकर उठून सूर्याकडे बघत भद्राच्या 12 नावांचे स्मरण करावे. यामुळे भद्राच्या अशुभ प्रभावापासून आपले संरक्षण होते.

भद्राची 12 नावे

धन्या, दधमुखी, भद्रा, महामारी, खरानना, कालरात्री, महारुद्रा, विष्टी, कुल पत्रिका, भैरवी, महाकाली, असुर क्षयकरी

Raksha Bandhan Bhadra Kal
Raksha Bandhan 2023 : भावाला राखी बांधताना पूजेच्या ताटात आवर्जून असाव्या या गोष्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.