Ear Piercing चे फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का? लहान मुलांसाठी आहे फायदेशीर

बाळाचे कान टोचल्यानंतर कानात सोन्याचे किंवा चांदीचे कानातले घातले जातात. कान हे केवळ फॅशनसाठी टोचले जात नसून त्यामागे विविध कारणं आहेत
का टोचायचे कान
का टोचायचे कानEsakal
Updated on

हिंदू धर्मामध्ये घरात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाचे कान टोचण्याची परंपरा आहे. केवळ मुलींचेच नव्हे तर मुलाचे देखील कान टोचले जातात. हिंदू धर्मातील काही महत्वाच्या परंपरांपैकी ही एक महत्वाची परंपरा आहे. Why ear piercing is importance for health tips in Marathi

काही जण बाळ अवघ्या १२ दिवसांचं असताना कान टोचतात. तर काही अडीच महिन्याचं किंवा ६ महिन्यांचं बाळ झालं की कान टोचण्याचा Ear Piercing विधी करतात. प्रत्येक कुटुंबात Family वेगवेगळ्या पद्धतीने हा कान टोचण्याचा विधी पूर्ण केला जातो.

बाळाचे कान टोचल्यानंतर कानात सोन्याचे किंवा चांदीचे Gold And Silver कानातले घातले जातात. कान हे केवळ फॅशनसाठी Fashion टोचले जात नसून त्यामागे विविध कारणं आहेत. कान टोचल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. कान टोचल्याने कानांसोबतच डोळे आणि मेंदूचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

डोळ्यांसाठी फायदेशीर

कान टोचल्याने डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. यामुळे दृष्टी चांगली होण्यास मदत होते. कानाच्या खाली असलेल्या ठराविक ठिकाणी डोळ्यांच्या नसा असतात. या ठिकाणी कान टोचल्याने दृष्टी चांगली होण्यास मदत होते.

मेंदूसाठी फायदेशीर

कान टोचल्याने मेंदूचं आरोग्य चांगलं राहण्यास आणि मेंदूचा विकास होण्यास मदत होते. इयर लोब म्हणजेच कानाच्या पाळीमध्ये मेरिडियन पॉइंट असतात जे मेंदूच्या उजव्या आणि डाव्याबाजूला जोडले गेलेले असतात. या पॉइंटजवळच कान टोचले गेल्याने मेंदूचे हे ठराविक भाग सक्रिय होण्यास मदत होते.

हे देखिल वाचा-

का टोचायचे कान
Wrestler Ear : पैलवानांचे कान सुपारी घालून फोडतात का?

ऐकण्याची क्षमता वाढते.

अॅक्यूप्रेशर तज्ज्ञांच्या मते कानाच्या खालच्या भागात मास्टर सेन्सरी आणि मास्टर सेरेब्रल नावाचे दोन इयर लोब असतात. या ठिकाणी कान टोचल्याने बिहिरेपणाची समस्या दूर होते.

महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या दूर

ज्या ठिकाणी कान टोचले जातात त्या ठिकाणचे पाॅईंट्स किंवा नसांचा थेट संबध हा महिलांच्या प्रजनन अवयवांशी जोडला गेलेला असतो. त्यामुळेच कान टोचल्याने महिलांमधील अनियमित पाळीची समस्या दूर होण्यासोबतच पाळी संबधीच्या इतर समस्या देखील दूर होतात.

पुरुषांसाठी देखील फायदेशीर

खास करून हिंदू धर्मामध्ये लहानपणीच मुलांचे देखील कान टोचले जातात. यामागे शास्त्रासोबतच वैज्ञानिक कारणं देखील आहेत. पुरुषांचे कान टोचल्याने त्यांना आरोग्याचे अनेक फायदे मिळतात. ज्या पुरुषांचे कान टोचलेले असतात. त्यांच्यामध्ये लकव्याची समस्या कमी प्रमाणात पाहायला मिळते.

तसंच कान टोचल्याने पुरुषांमध्ये हार्निया आणि हायड्रोसील सारख्या आजारांचा धोका दूर होतो. म्हणूनच मुलांचे देखील कान टोचले जातात.

पचनक्रिया सुधारते

कान टोचण्याचा पचनक्रियेशी देखील संबध आहे. यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. कानाच्या पाळीला किंवा ज्या ठिकाणी कान टोचले जातात. त्याला हंगर पॉइंट म्हंटलं जातं. म्हणूनच कान टोचल्याने काही अंशी लठ्ठपणाची समस्या कमी होवू शकते.

यासाठीच हिंदू धर्मातील कान टोचण्याची परंपरा ही आरोग्याठी देखील फायदेशीर असल्याने अलिकडे पाश्चात्य देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कान टोचण्यावर भर दिला जात आहे.

हे देखिल वाचा-

का टोचायचे कान
पावसाळ्यात Headphones-Earbuds खराब होण्याची चिंता कशाला करायची, हे जुगाड येतील कामी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.