Makar Sankranti : मकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या शास्त्रीय महत्त्व

makar sankranti
makar sankrantiSakal
Updated on

पौराणिक कथेनुसार, असे मानले जाते की संक्रांती ज्यांच्या नावावरून या उत्सवाचे नाव ठेवले गेले आहे - ती संक्रांती नावाची देवी होती.या संक्रांती देवीने शंकरासूर नावाच्या दुष्टाला मारले होते. मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) नंतर दुसऱ्या दिवशी करीदिन किंवा किंक्रांत असते. या दिवशी देवीने दैत्य किंकरासुरचा वध केला होता. त्यामुळे मकर संक्रांती साजरी केली जाते अशी मान्यता आहे.(Why is Makar Sankranti celebrated Learn the Scientific significance)

मकर संक्रांतीचे महत्त्व (Makar Sankranti Scientific significance)

मकर संक्रांतीला लोक गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी, शिप्रा, नर्मदा इत्यादी पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. सूर्य देवाला जल अर्पण करतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात.

लोक काशी, त्रिवेणी संगम आणि गंगा सागर यांसारख्या ठिकाणी स्नानासाठी गर्दी करतात.पवित्र नद्यान मध्ये डुबकी मारल्यास मोक्ष प्राप्त होते अशी मान्यता आहे.

देशातील विविध राज्यांमध्ये मकर संक्रांत वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते.

उत्तर भारतात मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी लोहरी साजरी केली जाते .म्हणजे दिल्ली हरियाणा आणि पंजाबमध्ये लोहरी साजरी केली जाते.

संध्याकाळी, लोक शेकोटीभोवती जमतात आणि तांदूळ,लाह्या आगीच्या ज्वाळांमध्ये टाकतात. आनंद, आरोग्य, वाढ आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात.

makar sankranti
मकर संक्रांतीला महिला लाखेचा चुडा का घालतात? हे आहे कारण

महाराष्ट्र बायकां वाण देण्यासाठी पंढरपूर, मोहोरची देवी,तुळजापूर येथे खास करुन जातात.

सर्व विवाहित स्त्रिया त्यांच्या पहिल्या संक्रांतीला कापूस, तेल आणि मीठ इतर सुहागणांना (विवाहित स्त्री) दान करतात.

सोबत तिळ गुळ घ्या गोड गोड बोला असा संदेश दिला जातो. त्यामुळे भारतात मकर संक्रांती उत्सवाचे स्वतःचे महत्त्व आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी त्याची स्तुती केली जाते आणि साजरा केला जातो.

makar sankranti
मकर संक्रांतीला बनवा स्वादिष्ट गुळ तिळाचे लाडू

सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात सुर्य एक रास बदलतो. मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात.फेब्रुवारी मध्ये कुंभ संक्रांत असते.मार्चमध्ये मीन, एप्रिलमध्ये मेष, मग वृषभ इत्यादी क्रम

थोडक्यात एक रास पुढे जातो.तारीख १५ एखादा दिवस पुढे मागे होतो.कारण इंग्रजी दिवस आणि महिन्याचा हिशोब.

हिंदु संस्कृतीतील एकमेव असा सण आहे जो तारीख फार बदलत नाही. याचे कारण म्हणजे तो सूर्याच्या कॅलेंडरनुसार व बाकी सर्व सण हे चंद्र कॅलेंडरवर (चंद्राच्या स्थानावर) आधारलेले असतात. सोलर सायकल ही दर ८ वर्षांनी एकदा बदलते, याआधी २०१६मध्ये संक्रांत १५ जानेवारी रोजी होती.

मकर संक्रांतीला शास्त्रीय महत्त्व आहे. या दिवसाच्या काही काळ आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रांती नंतर रात्री लहान दिवस मोठा होत जातो. तसेच संक्रांतीनंतर ऋतूबदल होण्यास सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते. उत्तरायण जरी सुरू झाले असले तरी सुरवातीला काही दिवस थंडी रहाते व नंतर उन्हाळा सुरु होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()