आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या महापुजेसाठी मुख्यमंत्रीच का? 'हे' आहे कारण..

पांडुरंगांच्या आषाढी वारीचा सांगता समारंभ महापूजेने होतो, पण असं एक कारण आहे ज्यामुळे या पूजेचा मान मुख्यमंत्र्यांनाच दिला जातो.
Why only the Chief Minister respects the great worship of Vitthal on Ashadi Ekadashi pandharpur  wari viththal mahapooja
Why only the Chief Minister respects the great worship of Vitthal on Ashadi Ekadashi pandharpur wari viththal mahapooja sakal
Updated on

ashadhi wari 2022 : विठ्ठल म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातला महाउत्सव आणि सर्वात मोठा सण म्हणजे पंढरीची वारी. महाराष्ट्रभरातून लाखो भाविक या सोहळ्यात जात, धर्म, पंथ विसरून सहभागी होत असतात. जवळपास महिनाभर चालणारी ही आषाढ वारी पंढरपूरात जाऊन विसावते आणि एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घेऊन हा सोहळा पूर्ण होतो. पण यामध्ये एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे, विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान हा केवळ महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला जातो. यामागेही एक विशेष कारण आहे..

(Why only the Chief Minister respects the worship of Vitthal on Ashadi Ekadashi pandharpur wari viththal mahapooja)

Why only the Chief Minister respects the great worship of Vitthal on Ashadi Ekadashi pandharpur  wari viththal mahapooja
Photo: 'या' कलाकारांनी घेतला यंदा वारीचा आनंद, गजर करत धरला ठेका..

वारी सुरू झाली की विठ्ठल मंदिर देवस्थानाकडून मुख्यमंत्र्यांना महापूजेचे आमंत्रण धाडले जाते आणि आषाढी एकादशी दिवशी महापूजेसाठी दरवर्षी मुख्यमंत्री पत्नीसह पंढरपूरात दाखल होतात. आजवरच्या या परंपरेत क्वचितच यात खंड पडला असेल. ही परंपरा किती जुनी आहे याविषयी सांगणे कठीण आहे पण ही परंपरा का सुरू झाले याचे मात्र एक महत्वाचे कारण आहे.

Why only the Chief Minister respects the great worship of Vitthal on Ashadi Ekadashi pandharpur  wari viththal mahapooja
वारीमध्ये दंग झाला स्वप्नील जोशी, विठूरायाला साकडं घालत म्हणाला..

महाराष्ट्राला राजा-महाराजांचा, अनेक घराण्यांचा मोठा इतिहास आहे. शिवाय पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न . अगदी शिवकाळापासूनच वारीमध्ये राजघराण्यांचा सहभाग असायचा. त्यामुळे वारी आणि शासन यांचे एक विशेष नाते आहे. आणि जो शासन कर्ता आहे आशा व्यक्तीच्या हातून महाराष्ट्राच्या आराध्य दैवताची पूजा व्हावी असा एक शिरस्ता आहे. पुढे संस्थाने गेली आणि लोकशाही आली. पण त्यात मुख्यमंत्रीच महापूजेसाठी का बसतात हे जाणून घेणेही महत्वाचे आहे. पण ही माहिती खाली दिलेल्या लिंक मध्ये आहे. तेव्हा महापूजे बाबत महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी vari unplugged या लिंकवर नक्की क्लिक करा.

या 'वारी unplugged ' या पॉडकास्ट सिरिजमध्ये तुम्हाला वारी, वारकरी संप्रदाय, तो का आणि कसा वाढला, वारकरी संप्रदायाने समाजाला कोणती महत्वाची देणगी दिली आणि अशा कितीतरी माहीत नसलेल्या विषयांची माहिती संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी उलगडली आहे. वारी सुरु होण्यापासून ते आषाढी एकदशी पर्यंतचा प्रवास विविध भागांमधून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. तेव्हा वारीची ही दिव्य परंपरा आणि आपला इतिहास जाणून घेण्यासाठी 'वारी unplugged' हा कार्यक्रम नक्की ऐका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.