पल्लवी कुलकर्णी- शुक्ल : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : गंगापूर रोड येथील जयश्री कुलकर्णी यांना पौरोहित्याबाबत लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांकडूनच बाळकडू मिळाले. त्यांचा आतापर्यंतचा प्रवास, पूजापाठाचा अनुभव, याबाबत त्यांच्याशी संवाद साधला. सौ. कुलकर्णी यांचे माहेर नाशिक व सासर लासलगावचे. वडिलांचे स्तोत्र, तसेच पुरुषसूक्त, स्त्रीसूक्त यांचे सातत्याने होणारे पठण यामुळे त्यांनाही त्यात गोडी निर्माण झाली. तसेच त्यांच्या आजी सासूबाईंकडे येणारे स्वामीजी विलीन आत्मा महाराज यांनी एकदा त्यांचे मंत्रपठण ऐकले व ते ऐकून प्रसन्न झाले. (Latest Marathi News)
पौरोहित्याचे 5 वर्षांचे शिक्षण पूर्ण
स्पष्ट मंत्रोच्चारामुळे त्यांनी गीता व विष्णुसहस्रनाम पठण त्यांच्याकडून करून घेतले. तसेच त्या नाशिकला यजमानांच्या नोकरीमुळे स्थित झाल्या. राणीभवन येथे पूजापाठ, मंत्रोच्चार वर्ग सुरू आहेत. याविषयी त्यांना कळल्यावर १९९७ मध्ये त्यांनी तेथे प्रवेश घेतला. विद्याताई दुगल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षांचे शिक्षण पूर्ण केले. घरून पूर्णपणे पाठिंबा मिळाला. पतीला व मुलीला कौतुक होते. विनायक साने गुरुजी यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. गुरूंनी निःस्वार्थ भावनेने केलेले मार्गदर्शन तसेच प्रशिक्षणानंतर २००१ पासून शिकविण्याची दिलेली जबाबदारी यामुळे त्यांच्या पाठांतरात व ज्ञानात भर पडत गेली. प्रसाद मंगल कार्यालयात पहिल्यांदा महिलांना शिकविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. ती त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
तद्नंतर राणीभवन येथे वर्ग घेण्यास सुरवात केली. तसेच पौरोहित्य करतानाचा अनुभव कथन करताना त्या म्हणाल्या, की सत्यनारायणपूजा सांगण्यासाठी मैत्रिणीकडे गेले होते. आजोबा पूजेला बसले होते. मैत्रिण म्हणाली सांभाळून घे, तेव्हा तिला म्हटले तू काळजी करू नको. त्यांनी सांगितलेली पूजा आजोबांना खूप आवडली व आजोबांनी त्यांना ‘गुरू माँ’ म्हणून हाक देत पूजा खूप छान झाल्याचे सांगितले. मंत्रोच्चारातून सभोतालच्या वातावरणात निर्माण होणारे चैतन्य, यजमानांकडून मनोभावे पूजा करून घेतानाचा तसेच त्यांना पडलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देतानाचा अनुभव छान असतो. तसेच यातून आत्मसंतुष्टी मिळते व स्वतःचा विकास प्रगतीकडे होताना मन प्रसन्न होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.