मराठी भाषा गौरव दिन : सोशल मीडियावर लिहणाऱ्या तरुणांचे मनोगत

माय मराठीचे संवर्धन केले तरच ती टिकणार आहे नाहीतर, भविष्यात मराठीच्या अस्तित्वावरच प्रश्न उठण्याची भीती आहे.
Marathi-Bhasha-Divas
Marathi-Bhasha-DivasSakal
Updated on

मराठी भाषिक हे फक्त महाराष्ट्रातच (Maharashtra) नसून ते अवघ्या जगाच्या कानाकोपऱ्यात राहतात त्यामुळे हा दिवस जगाच्या कानाकोपऱ्यात साजरा होतो असं म्हणायला हरकत नाही. मराठी सोशल मिडियावर (Social Media) लिहणाऱ्या लेखिका स्नेहा विद्या मच्छिन्द्र मिरगणे असंच म्हणतात की, "आईच्या जागी मॉम आणि बाबांच्या जागी डॅड आले, मराठीच्या जागी हिंदी इंग्रजी आली. बरं या सगळ्यात बाकीच्या भाषा बोलूच नका असं मी म्हणत नाहीये पण निदान आपल्याला मराठी बोलता, लिहिता आणि वाचता तरी यायला हवी. (Marathi Bhasha Din)

Marathi-Bhasha-Divas
मराठी राजभाषा दिन : बोलीभाषेतील हरवलेल्या शब्दांची गोष्ट

माय मराठीचे संवर्धन केले तरच ती टिकणार आहे नाहीतर, भविष्यात मराठीच्या अस्तित्वावरच प्रश्न उठण्याची भीती आहे. त्यामुळे मराठी भाषेचे जतन करणे, तिला जपणे ही आपलीच जबाबदारी आहे. एखाद्या गोष्टीची किंमत तेव्हाच टिकून राहते जेव्हा आपण तिला तेवढं महत्व देऊ. त्यामुळे मराठी भाषेचे महत्व समजून घेऊन इतरांना पण सांगायला हवे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी भाषा ही बोलता, वाचता आणि विशेष म्हणजे जगता यायला हवी". (Marathi Bhasha Din Article)

Marathi-Bhasha-Divas
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा PM मोदींना फोन, म्हणाले...

मराठी भाषा टिकवण्यासाठी काय करावे असा प्रश्न आम्ही जेव्हा ह.भ.प सागर महाराज भोंडे पाटील यांना विचारला तेव्हा ते सांगतात की, "लहानपणीच मुलांना इंग्रजीसोबत मराठी भाषेचे ज्ञान द्या, मुलांना मराठी शाळेत (Marathi School) पाठवा, जर इंग्रजी शाळेत गेला तर आपल्या विद्यार्थ्याची दुसरी भाषा मराठी असावी हा कटाक्ष तुम्ही तुमचा ठेवा. तुमच्या मुलांना महाराष्ट्राचा इतिहास, मराठीचा इतिहास, आपल्या भाषेतील साहित्य वाचायला प्रवृत्त करा, हे करताना तुम्ही ते पहिले करीत आहात का, हे पहा. लहान मुले आपलेच अनुकरण करीत असतात. म्हणून पहिले स्वतः करा नंतर दुसर्‍यांमध्ये बदल घडवा. म्हणूनच सुरुवात स्वतःच्या घरातून करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदल एका रात्रीत घडणार नाही. म्हणून आपले प्रयत्न सुरूच ठेवा".

Marathi-Bhasha-Divas
Video : राज्यात दुकानांवर मराठी बोर्ड लावायला हरकत काय आहे?

मराठीचा अस्सल बाणा असणारी शाहिरी सादर करणारे शाहिर युवाशाहीर विक्रांतसिंह सज्जनसिंह राजपुत हे मराठी भाषेविषयी सांगतात की, मराठी म्हणजे संतांच्या वाणीतील अमृतधारा, मराठी म्हणजे इच्छापूर्तीचा तुटता तारा, मराठी म्हणजे मधाळ, रसाळ आणि अगदी मवाळ शाहिरांनीसुद्धा मराठी भाषेच्याच माध्यमातून प्रबोधन केले आहे. शाहीर देवानंद माळी यांच्या एका पोवाड्यात त्यांनी मराठीचं वर्णन केलंय ही

मराठी महाराष्ट्राची माझ्या देशाची साधू संतांची।

गर्जती सह्याद्रीचे कडे।

मराठी पाऊल पडते पुढे जी जी जी।।

पुढे आम्ही सोशल मीडियावरील नवोदित लेखिका पूजा ढेरिंगे यांच्यासोबत मराठी भाषेविषयी बोललो तर त्या म्हणतात की, "उरते, पुरते पण नडतेही मराठी. ऑफिसमध्ये शिरताना मराठी संभाषण कानावर पडलं आणि हायसं वाटून गेलं. पण ती मराठी फक्त शिपाई काकांच्या तोंडून ऐकू येते. कुवत दाखवायची मग इंग्रजीच बोलायचं असा ऑफिसवाल्यांचा आग्रह! त्यामुळे खिसा फाटू द्यायचा नसेल तर, मराठीचा अभिमान खिशात ठेवून इंग्रजीला वाणीत असू द्यावं लागलं. माणूस त्याच्या आजूबाजूच्या माणसांकडून भाषा शिकू लागतो. हे शिकणं म्हणजे भाषाओळख. पण त्या गोडीतून जेव्हा मराठीच्या प्रवाही साहित्याकडे वळू लागतो तेव्हा भाषेचा गाभा कळू लागतो. महाराष्ट्राला लाभलेली संतांची अनन्यसाधारण परंपरा आयुष्याची गुपितं सांगून जाते.

Marathi-Bhasha-Divas
सोशल मीडिया खरंच पूर्णपणे बंद झाला तर? कसं असणार त्यानंतरचं जग

बालवयात मराठीशी बालमैत्रिणीसारखी गट्टी जमली. शालेय जीवनात पालकांच्या धाकातून आवांतर वाचनाने मराठीतल्या गोष्टी वाचू लागले. पण महाविद्यालयीन काळात कॉलेजच्या कट्ट्यावर कुसुमाग्रजांपासून, शिवाजी सावंत, शांता शेळके, खांडेकर, पाडगावकर आणि खास व.पु आणि दुर्गा भागवतही जमू लागल्या, तेव्हा हे सगळे आपलेसे वाटू लागले. तेव्हाच अनेक माध्यमांतून हळूहळू मराठीची गोडी, महती, हेटाळणी, उपरोधिकपणा नि अतिशयोक्तीचे स्थान कळू लागले.

सुरुवातीला तारुण्याच्या जोशात "गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा, मराठ्यांना नडेल तो नरकात सडेल! अशा घोषणा ऐकून तर हसूही यायचं नि अभिमानही वाटायचा. ही जगावेगळी शब्दरचना वाचली की वाटायचे, ही कला आहे शब्दांची की भाषेच्या नागमोडी वळणाची? ज्याची त्याची मायबोली ज्याचं त्याच पॉकेट आयडी असते. तिचा मान आणि भान जपणे गरजेचे! दक्षिण भारतातले लोक त्यांच्या संस्कृतीवर ठाम राहून भाषा, वास्तू, संस्कृती यांना प्रथम प्राधान्य देतात.

Marathi-Bhasha-Divas
मराठी : एक फॉरेन लँग्वेज!

महाराष्ट्र त्याबाबतीत खूप उदार आहे. पर्यटन आणि राज्याच्या विकासासाठी परप्रांतियांचे स्वागत करावे पण, तडजोड करत त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या भाषेला महत्त्व देणं आपल्यासाठी घातक ठरत चालले आहे. कारण आज कॉर्पोरेट जगात तर इंग्रजीच मिरवली जाते. याचं कारण म्हणजे तिथे येणाऱ्या अनेकांनी नोकरीचे ध्येय समोर ठेवून बालपणापासून मराठीला दुय्यम स्थान दिले आहे. याउलट सोशल मीडियावर ऐंशी, नव्वदीची पिढी मराठीतूनच पोस्ट, लेख, ब्लॉग्ज, व्लॉग्ज प्रदर्शित करत आहे. त्यांचं मराठी माध्यमातील शिक्षण त्यांना मराठीचा वारसा जपायला सांगते. पण त्यांची घुसमट म्हणत राहते,

संवादात उरली ती मराठी!

उदरनिर्वाहासाठी पुरली ती मराठी!

अन् आताच्या इंग्रजी काळात, नोकरीसाठी नडली ती मराठी!

पण ही पिढी संपुष्टात आल्यानंतर काय?

मराठीचा आवाका प्रत्येक भाषेइतकाच भव्य होता. पण ती भूतकाळात जमा व्हायला नको. ती रोज जगायला आणि जपायला हवी ! इथे शाल मराठीची पांघरूण, दिखाव्याची इंग्रजी बोलली जाते. पण सुख- दुःखाच्या भावनिक गुंत्यात मात्र माय मराठीच स्मरते! राज्यशासनाने दुकानांवर मराठी पाट्यांचा जाहीर केलेला निर्णय स्वागतार्ह आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्रात मराठी शाळांकडे प्रामुख्याने लक्ष देऊन तिथे ज्ञानी शिक्षक, उच्च सोयी सुविधांचा वापर वाढवायला हवा. कारण मराठी टिकवायची असेल तर, नव्या येणाऱ्या पिढीला मराठी भाषेकडे आकर्षित करण्याची गरज आहे. आज कुसुमाग्रजांच्या कर्तृत्वस्मृतीला अभिवादन करून म्हणावे वाटते,

"बालभारतीतला मोरपीस आजही नाचतो मनी,

अजुनही आहे मुक्ताईची ओवी नि तुकारामांचा अभंग ध्यानी!

ज्यामुळे अवघा महाराष्ट्र जाहला मराठीमय,

त्या थोर कवीला शब्दसाष्टांग अभिवादन !"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.