Shraddha Murder Case : आफताबला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात मदत करणारे १० पुरावे कोणते?

आफताबने ज्या क्रूरतेने श्रद्धाची हत्या केली, त्याने संपूर्ण देश हादरला आहे.
Shraddha Murder Case
Shraddha Murder Caseesakal
Updated on

श्रद्धा वालकर खून प्रकरणात दिवसेंदिवस अधिक गंभीर आणि महत्त्वाचे खुलासे होत आहेत. प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे करून आफताब अमीन पूनावाला या आरोपीने ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज थोडे थोडे करत जंगलात टाकून दिले. यानंतर त्याच्या क्रूरतेच्या आणखीही काही घटना समोर येत आहेत. अशात आता काही महत्वाचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

Shraddha Murder Case
Shraddha Murder Case : प्रेताचे तुकडे केले, पण शीर तसंच ठेवलं! मेकअप करून तासन् तास बघत बसायचा

आफताबला पोलिसांनी अटक केली असून दिल्ली पोलीस आता या हत्याकांडाचा तपास करत आहेत. त्यासाठी आफताबने ज्या ठिकाणी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे टाकले, त्या ठिकाणी पोलीस त्याला घेऊन गेले. सहा महिन्यांपूर्वी म्हणजे १८ मे रोजी झालेल्या या हत्याकांडात आत्तापर्यंत कोणकोणते पुरावे हाती लागले आहेत, ज्यामुळे आफताब आरोपी सिद्ध होऊ शकतो, ते खालीलप्रमाणे -

Shraddha Murder Case
Shraddha Murder CaseSakal

१. श्रद्धाचा मृतदेह ठेवण्यासाठी आफताबने ज्या दुकानातून फ्रीज घेतला, त्या दुकानाची माहिती पोलिसांनी घेतली आहे. तसंच दुकानदाराचा जबाबही नोंदवला आहे.

२. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेली करवत ज्या दुकानातून घेतली होती, तिथल्या दुकानदाराचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. या दुकानदाराने आफताबला ओळखलं आहे.

३. श्रद्धाच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी आफताबने ऑनलाईन वस्तू जिथून मागवल्या, त्या कंपन्यांशीही पोलिसांनी संपर्क केला असून काही वेळातच त्यांच्याकडूनही माहिती हाती येणार आहे.

४. श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी आफताब श्रद्धाला मारहाण करायचा असा आरोप करत जबाब नोंदवला आहे.

५. आफताब आणि श्रद्धाच्या शेजाऱ्यांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. यांच्या घरातून सतत भांडणाचे आवाज यायचे, असं यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं आहे.

Shraddha Murder Case
Shraddha Murder Case : मृतदेह फ्रीजमध्ये असताना 'तो' त्याच फ्लॅटवर दुसऱ्या मुलींसोबत सेक्स करायचा!
Shraddha Walker
Shraddha WalkerSakal

६. आफताब आणि श्रद्धाच्या मित्रांचेही जबाब नोंदवण्यात आले. श्रद्धाचा मित्र लक्ष्मणने श्रद्धाचा अनेक महिन्यांपासून संपर्क झालेला नसल्याचं कुटुंबियांना सांगितलं होतं. त्यानंतरच श्रद्धाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती.

७. श्रद्धाचा मित्र रजत शुक्लाने आधीही सांगितलं होतं की, आफताब श्रद्धाला मारहाण करायचा आणि तिला त्याला सोडायचं होतं. हा जबाबही महत्त्वाचा ठरणार आहे.

८. आफताबच्या हाताला जखम झालेली असताना त्याच्यावर ज्या डॉक्टरांनी उपचार केले, त्यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करतानाच आफताबच्या तळहाताला जखम झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

९. पोलिसांना मेहरोलीच्या जंगलात १३ हाडं सापडली आहेत. या हाडांची डीएनए टेस्ट केली जाणार असून तिच्या वडिलांचा डीएनए त्याच्याशी जुळतोय का हेही तपासलं जाणार आहे.

१०. श्रद्धाचा मोबाईल फोन, आणि त्याच्या माहितीचाही तपास केला जाईल. शिवाय तिच्या खात्यातून काही पैशांचे व्यवहारही झाले आहेत. पोलिसांच्या हाती लागलेल्या या माहितीचाही पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.