Rudraprayag Accident: उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये एक मिनी बस खोल दरीत कोसळल्यानं त्यातून प्रवास करणाऱ्या १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखमी झाले आहेत. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील बद्रीनाथ महामार्गावर शनिवारी ही दुर्घटना घडली. (10 people killed as tempo traveller falls into deep gorge in Uttarakhand Rudraprayag)
या दुर्घटनेची माहिती कळताच राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीनं बचाव मोहिम राबवली. जखमींपैकी चार जणांची अवस्था गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेबद्दल उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मृतांप्रती दुःख व्यक्त केलं आहे. तसंच गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांवर ऋषिकेशमधील AIIMS रुग्णालयात उपचार करण्यात येतील असं जाहीर केलं आहे. दरम्यान, जखमींवर चांगल्या प्रकारचे उपचार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, टेम्पो ट्रॅव्हलर ही मिनी बस नोयडाकडून रुद्रप्रयागच्या दिशेनं निघाली होती. यावेळी बस १५० मीटर खोल दरीत कोसळली, ही दुर्घटना कशामुळं घडली याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.