Rajya Sabha Election : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभेच्या दहा जागा रिक्त! महाराष्ट्रातील दोन तर भाजपच्या सात जगांचा समावेश

राज्यसभेतील दहा खासदार लोकसभेवर निवडून गेल्याने वरिष्ठ सभागृहातील १० जागा रिक्त झाल्या आहेत.
10 Rajya Sabha seats become vacant after Rajya Sabha MP winning Lok Sabha elections udayanraje bhosale piyush goyal
10 Rajya Sabha seats become vacant after Rajya Sabha MP winning Lok Sabha elections udayanraje bhosale piyush goyal
Updated on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जिंकणाऱ्या राज्यसभा खासदारांमुळे महाराष्ट्र, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी दोन जागा तर हरियाना, मध्यप्रदेश, राजस्थान आणि त्रिपुरा या राज्यांमधील प्रत्येकी एक जागा रिक्त झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात पीयूष गोयल, उदयनराजे भोसले यांचा समावेश आहे. राज्यसभा सचिवालयाने याबाबतची औपचारिक घोषणा केली आहे.

राज्यसभेतील दहा खासदार लोकसभेवर निवडून गेल्याने वरिष्ठ सभागृहातील १० जागा रिक्त झाल्या आहेत. यातील सात खासदार भाजपचे तर दोन खासदार कॉंग्रेसचे आहेत. राष्ट्रीय जनता दलाच्या एका खासदाराचाही यात समावेश आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले आणि वरिष्ठ सभागृहाचे सभागृह नेते असलेले पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबई मतदार संघातून तर, उदयनराजे भोसले हे सातारा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला असल्याने महाराष्ट्रातील लोकसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत.

त्याचप्रमाणे भाजपचे मध्यप्रदेशातील राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे हे गुणा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकले असून त्यांना नव्या मंत्रिमंडळात मंत्रालयाची जबाबदारी मिळाली असल्याने ही जागा देखील रिक्त झाली आहे. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री भाजपचे राज्यसभा खासदार बिप्लवकुमार देव हे देखील लोकसभा निवडणूक जिंकले असल्याने वरिष्ठ सभागृहातील त्यांची जागा रिक्त झाली आहे.

10 Rajya Sabha seats become vacant after Rajya Sabha MP winning Lok Sabha elections udayanraje bhosale piyush goyal
Lok Sabha Special Session: लोकसभेचं २४ जूनपासून विशेष अधिवेशन, लोकसभा अध्यक्षांची होणार निवड

दरम्यान, आसाममधून राज्यसभेवर गेलेले भाजपचे खासदार कामाख्यप्रसाद तासा आणि सर्वानंद सोनोवाल लोकसभा निवडणूक जिंकले आहेत. सर्वानंद सोनोवाल यांना एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळात बंदर आणि जहाजबांधणी खात्याच्या मंत्रिपदाची संधी देखील मिळाली आहे. बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाच्या राज्यसभा खासदार मिसा भारती या लोकसभेमध्ये पाटलीपुत्र मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. तर, भाजपचे राज्यसभा खासदार विवेक ठाकूर हे बिहारच्या बांकीपूर मतदारसंघातून विजयी झाले. याखेरीज राज्यसभेवर कॉंग्रेसचे राजस्थानमधून प्रतिनिधित्व करणारे नेते के. सी. वणुगोपाल केरळमधून अलप्पुझा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकले आहेत. तर, हरियानातील कॉंग्रेस नेते दिपेंद्र हुड्डा हे रोहतकमधून लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांचीही राज्यसभेची खासदारकी संपुष्टात आली आहे.

10 Rajya Sabha seats become vacant after Rajya Sabha MP winning Lok Sabha elections udayanraje bhosale piyush goyal
UP Election Result: उत्तर प्रदेशात धक्कादायक निकालाचं खरं कारण आलं समोर...नोटा कसं ठरलं गेम चेंजर?

राष्ट्रवादी कॉंग्रेसची तयारी सुरू

केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा खासदारकीमुळे राज्यसभेच्या रिक्त झालेल्या दोन्ही जागांसाठी आग्रही आहे. पक्षप्रमुख अजित पवार यांनी याआधीच जाहीर केले होते, की महाराष्ट्रातून रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार निवडून येतील आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पक्ष नेते प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.