Bihar : पेपर फोडल्यास दहा वर्षे कारावास;गैरप्रकार रोखण्यासाठी बिहारमध्ये कठोर कायदा

‘नीट’ परीक्षेसह अनेक परीक्षांचे पेपरफुटीचे एक मुख्य केंद्र असलेल्या बिहारने सरकारी परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा केला आहे.
Bihar
Bihar sakal
Updated on

पाटणा : ‘नीट’ परीक्षेसह अनेक परीक्षांचे पेपरफुटीचे एक मुख्य केंद्र असलेल्या बिहारने सरकारी परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा केला आहे. या कायद्यानुसार पेपर फोडणाऱ्यांना दहा वर्षांचा तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांचा दंड अशी शिक्षा केली जाणार असून दोषींची संपत्तीही जप्त करण्याची तरतूद आहे.

बिहार विधानसभेत बुधवारी पेपरफुटीविरोधी विधेयक मंजूर झाले आहे. यामुळे आता राज्यात कोणत्याही परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फोडणाऱ्याला कठोर शिक्षा सुनावली जाऊ शकते. ‘नीट-यूजी’ परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरणाचे धागेदोरे दिल्ली, बिहारसह अन्य राज्यांपर्यंत पोहोचले आहेत. बिहारमधील अनेकांना अटक झाली आहे.

अशा गैरप्रकारांना अटकाव घालण्‍यासाठी मंत्री विजयकुमार चौधरी यांनी आज विधानसभेत विधेयक मांडले. ‘‘अशा परीक्षा साधारणपणे प्रवेश आणि सरकारी सेवांसाठी घेतल्या जातात. ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटीच्या घटनेने केंद्र आणि राज्य सरकार चिंतेत होते. असे विधेयक मांडण्याचा प्रयत्न १९८१ मध्येही केला होता.

पण आताच्या काळात तो निष्प्रभ ठरला आहे. बिहार सरकारकडून आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांना हा कायदा लागू होईल. केंद्राने असा कायदा आधीच लागू केला आहे,’’ असे त्यांनी चौधरी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.