‘ऑपरेशन कमळ’च्या (ऑपरेशन लोटस) माध्यमातून राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा भाजपचा कथित प्रयत्न आहे.'
बंगळूर : कर्नाटकातील सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजप ‘ऑपरेशन कमळ’चा (Operation Lotus) प्रयत्न करत असल्याचा आरोप करत सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने रविवारी दावा केला की, काँग्रेस आमदारांना (Congress MLA) १०० कोटी रुपयांची ऑफर देऊन भुलवण्याचा प्रयत्न सुरू आहे.