PM Narendra Modi : मोदी मेरा लाल! १४ लेकरांची आई PM मोदींना देणार १५ एकर जमीन; कारणही सांगितलं

100 year old women with 14 childrens call pm modi son want to donate 25 bigha land
100 year old women with 14 childrens call pm modi son want to donate 25 bigha land
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी मध्य प्रदेशच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमीत्त प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. यादरम्यान राजगड डिल्ह्यातील एक वृद्ध महिलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हा त्यांचा मुलगा असल्याचे म्हटले आहे.

या महिलेचं वय १०० वर्ष असल्याचं सांगितलं जात असून त्यांचं नाव मांगी बाई आहे. तसेच ही महिला पंतप्रधान मोदींना 15.475 एकर म्हणजेच २५ बीघे जमीन देखील देणार आहे. त्यांना पीएम मोदी यांची भेट घेण्याची देखील इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वृद्ध महिलेला स्वतःचे १४ मुलं आहेत तरी देखील मोदी स्पेशल लेक असल्याचे या महिलेने सांगितले आहे.

100 year old women with 14 childrens call pm modi son want to donate 25 bigha land
Santosh Shinde Death : अखेर सोलापूरच्या हॉटेलात सापडले संतोष शिंदेंचे गुन्हेगार! माजी नगरसेविका अन् पोलिस अधिकारी ताब्यात

ही वृद्ध महिला मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील हरिपुरा जागीर गावातील रहिवासी आहेत. कुटुंबियांनुसार त्यांचं वय १०० वर्ष आहे. त्यांनी आपल्या घरात पीएम मोदी यांचा फोटो लावला आहे. तो फोटो त्या रोज सकाळी जवळ घेतून पाहातात.

महिलेचं म्हणणं आहे की, मोदी मला मदत करत आहेत. मी दर महन्यानला गहू आणि पेशंन देतात. माझे १४ मुलं आहेत मात्र मोदी देखील माझा मुलगा आहे. मला माझी २५ बिघे जमीन द्यायची आहे. मला पंतप्रधानाना भेटाण्याची इच्छा आहे असेही त्यांनी सांगितलं.

100 year old women with 14 childrens call pm modi son want to donate 25 bigha land
BRS : तेलंगणा मुख्यमंत्र्यांची आज महाराष्ट्रात ग्रँड एंट्री! ३०० गाड्यांचा ताफ्यासह सोलापूरात धडकणार 'बीआरएस'

वृद्ध महिलेने सांगितेलं की त्या पीएम मोदींच्या चांगल्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थाना करतात, तसेच टीव्हीवर मोदींना बऱ्याचदा पाहिलं आहे. मला त्यांना भेटण्याची देखील इच्छा आहे. माझ्या मुलांपैकी मोदी सगळ्यात स्पेशल आहेत.

ते वृद्धांना घर देत आहेत. त्यांच्या खाण्या-पिण्याची काळजी घेत आहे, दर महिन्याला गहू आणि पेन्शन देखील देत आहेत. त्यांनी सांगितलं की, जर संधी मिळाली तर त्या मोदींच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद देतील. यासोबतच त्यांनी आपली पेन्शन आणखी थोडी वाढवण्याची मागणी देखील करणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.