West Bengal Voilence: हिंसाचाराच्या दहशतीत प. बंगालमध्ये मतदान सुरु; 12 जणांचा मृत्यू

निवडणुकीसाठी केंद्रीय दलाच्या तैनातीवरून टीएमसी, भाजपत हा संघर्ष पहायला मिळाला आहे.
West Bengal
West Bengal
Updated on

कोलकाता : हिंसाचाराच्या दहशतीत पश्चिम बंगालमध्ये सध्या पंचायत निवडणुकांसाठी मतदान सुरु आहे. या हिंसाचारात १२ जणांचा मृत्यू झाल्यानं तणावाचं वातावरण आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हा संघर्ष पहायला मिळाला आहे. निवडणुकीसाठी केंद्रीय दलाच्या तैनातीवरून टीएमसी आणि भाजपमध्ये वाद झाल्याने वेगवेगळ्या घटनांमध्ये बारा जण ठार झाले आहेत. (11 dead in violence as Bengal votes for panchayat polls Trinamool BJP blame game)

West Bengal
MP Urination case: CM चौहान यांनी 'त्या' आदिवासी व्यक्तीचे पाय धुतल्यानं सुटणार आरोपी!

पश्चिम बंगालमध्ये शनिवारी सकाळी सात वाजता पंचायत निवडणुकांना सुरुवात झाली. त्यानंतर दुपारपर्यंत तृणमूल-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होऊन ९ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या काही घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. मृतांमध्ये टीएमसीचे पाच तर भाजपचा एक आणि काँग्रेसच्या एक कार्यकर्त्याचा समावेश आहे. तसेच याव्यतिरिक्त दुसऱ्या एका हिंसाचाराच्या घटनेत अपक्षाच्या समर्थकाचाही मृत्यू झाला आहे.

West Bengal
Sharad Pawar On Bhujbal : भुजबळ सोडून गेल्याचं दुःख वाटतं का? शरद पवार म्हणाले, तो माझा दोष…

या घटनेमुळं संपूर्ण राज्यभरात तणावाचं वातावरण आहे. राज्यात पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा बदलांना तैनात करण्यात आलं आहे. तरीही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार पहायला मिळत आहे. पूर्व मेदिनीपूरच्या नंदीग्राम ब्लॉक १ च्या रहिवाशानं तृणमूल काँग्रेसवर बूथ कॅप्चर करण्याचा आरोप करत बहिष्कार घातला. लोकांचं म्हणणं आहे की, महम्मदपूरच्या बूथ क्रमांक ६७ आणि ६८ मध्ये केंद्रीय बलांना तैनात करण्याची मागणी करण्यात आली आहे, जोपर्यंत ते तैनात होत नाहीत तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.