Real India! देशातील १२ शरणार्थी गायकांनी गायलं 'जन गण मन', मनाला स्पर्श करणारा व्हिडिओ वायरल

चार देशातील १२ शरणार्थ्यांनी मधुर सुरात गायलेल्या राष्ट्रगीताच्या व्हिडिओचं सर्वच स्तरातून कौतुक केल्या जातंय.
Ministry of culture shared refugee national anthem video
Ministry of culture shared refugee national anthem videoesakal
Updated on

भारतात ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभर राष्ट्रगीत गायल्या गेलं. त्यानंतर तिरंगाही फडकवल्या गेला. दररोज शाळा, विद्यालयांमध्ये राष्ट्रगीत म्हटल्या जातं. ९९ टक्के भारतीयांना राष्ट्रगीत पाठ असतं. मात्र यंदा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भारतात राहाणाऱ्या शरनार्थी १२ गायकांनी त्यांच्या मधुर आवाजात राष्ट्रगीत म्हटलंय. मनाला स्पर्श करणारा त्यांनी म्हटलेल्या राष्ट्रगीताचा हा व्हिडिओ सगळीकडे चांगलाच व्हायरल होतोय. (Ministry of culture shared refugee national anthem video)

हे सगळे रिफ्यूजी मूळचे अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका आणि कॅमरूनचे आहेत. या बारा कलाकारांनी ग्रॅमी पुरस्कार विजेता रिकी केजसोबत राष्ट्रगीत म्हटले. हा मधुर आवाजातील व्हिडिओ केंद्रिय संस्कृती मंत्रालयाच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलाय.

मंत्रालयाने यावर ट्विट करत लिहीले आहे की, जगभऱ्यातून भारतावर प्रेमाचा वर्षाव होतोय. भारताच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रिकी केज आणि चार वेगवेगळ्या देशातील १२ गायकांनी भारताचं राष्ट्रगीत गात त्यांचं भारतावर असणारं प्रेम व्यक्त केलंय. त्यांच्या या व्हिडिओला भारतासह इतरही देशांतून प्रतिक्रिया येताय. या हृदयस्पर्शी व्हिडिओचं सर्वच स्तरातून कौतुक केल्या जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.