Delhi News: 12 वर्षाच्या विद्यार्थ्याला वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून शाळेत मारहाण; 9 दिवसांनी मुलाचा रुग्णालयात मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू

12-year-old student beaten up at school by upperclassmen; Child died in hospital after 9 days: दिल्लीच्या सरकारी शाळेत वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा ९ दिवसांनंतर रुग्णालयात मृत्यू झाला.
Delhi News
Delhi NewsEsakal
Updated on

राजधानी दिल्लीतील रुग्णालयात एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शाळेतील वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मुलावर हल्ला केल्याचा आरोप आहे. ही घटना 11 जानेवारी रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांच्या अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, 20 जानेवारी रोजी एका 12 वर्षांच्या मुलाचा रुग्णालयात मृत्यू झाला. दिल्लीतील एका शाळेतील वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मुलावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर नऊ दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच पोलिस कायदेशीर कारवाई करतील. ही घटना 11 जानेवारी रोजी घडली. त्यानंतर 20 जानेवारीला मुलाचा मृत्यू झाला.

Delhi News
Lok Sabha Election: लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखेसंदर्भात पत्र व्हायरल, निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मृत विद्यार्थ्याचे वडील राहुल शर्मा यांनी घटनेनंतर सांगितले की, "त्यांच्या मुलाला शाळेतील वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी मारहाण केली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. जेव्हा सहावीच्या वर्गात शिकणारा माझा मुलगा 11 जानेवारी रोजी सरकारी शाळेतून घरी परतला, तेव्हा तो खूप लंगडत चालत होता आणि त्याला खूप वेदना होत होत्या. मी त्याला याबद्दल विचारले, पण तो गप्प राहिला."

"त्याची तब्येत ठीक नव्हती म्हणून आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे त्याला काही औषधे दिली गेली आणि काही दिवस आराम करण्यास सांगितले पण घरी आल्यावर त्याची प्रकृती बिघडली आणि मग आम्ही त्याला रोहिणीतील एका रूग्णालयात घेऊन गेलो."

Delhi News
Ram Mandir Crowd: रामलल्लाच्या दर्शनासाठी दुसऱ्या दिवशीही तुफान गर्दी! थेट मुख्य सचिव अन् पोलीस महासंचालक मैदानात

पुढे शर्मा यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाचा 20 जानेवारी रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत त्याच्यावर का हल्ला झाला हे आम्हाला माहीत नाही. त्याला सैन्यात भरती व्हायचे होते. त्याची सारी स्वप्ने भंग झाली.”

पोलिस उपायुक्त (उत्तर) मनोज कुमार मीना यांनी या घटनेला दुजोरा दिला आणि ते म्हणाले, "आम्ही मुलाच्या मृतदेहाचे डॉक्टरांच्या मंडळाकडून शवविच्छेदन करत आहोत आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करू."

Delhi News
Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता, उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीपासून मिळणार दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.