Crime News:12 वर्षीय मुलीवर अत्याचार, रक्तबंबाळ अवस्थेत मदतीसाठी दारोदार जात होती पण...

उजैनमध्ये आई-केलीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली आहे. १२ वर्षाच्या मुलीने या बलात्कारांच्या तावडीतून सुटका करत पळ काढला.
Crime
Crimesakal
Updated on

Physical Assault on 12 Years old minor:धर्माची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उज्जैनमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. उजैनमध्ये आई-केलीवर सामुहिक बलात्काराची घटना घडली आहे. १२ वर्षाच्या मुलीने या बलात्कारांच्या तावडीतून सुटका करत पळ काढला. सामुहिक अत्याचाराला बळी पडलेली १२ वर्षांची ही मुलगी अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात मदतीची याचना करत राहिली, पण कुणालाही दया आली नाही.

अडीच तासांहून अधिक काळ रस्त्यावर भटकणाऱ्या या मुलीला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेने सांगितले की, तिच्या आईवरही अत्याचार करण्यात आले आणि ती कशीतरी आपला जीव घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाली. पोलिसांना ना तिच्या आईचा शोध लागला ना गुन्हेगारांचा शोध लावता आला.

क्रूरतेला बळी पडलेली ही मुलगी रक्ताने माखलेली होती आणि तिच्या शरीराच्या खालच्या भागात कपडे नव्हते. बराच वेळ ती मदत मागत राहिली. लोकांनी तिला मानसिकदृष्ट्या आजारी मानलं आणि कोणतीही मदत केली नाही. ती इकडून तिकडे भटकत राहिली आणि नंतर महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरलीपुरा येथे बेशुद्ध पडली. यानंतर काही लोकांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी मुलीला रुग्णालयात नेलं आणि चौकशी केल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. पीडितेला पुढील उपचारांसाठी इंदोरला पाठवण्यात आलं, जिथं तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

Crime
Pankaja Munde : अडचणीत सापडलेल्या बहिणीला भाऊ देणार मदतीचा हात; पंकजांबद्दल धनंजय मुंडे म्हणाले...

उज्जैनचे एसपी सचिन शर्मा म्हणाले, 'पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी विशेष तपास पथकं (एसआयटी) तयार केली आहेत. ही तरुणी उत्तर प्रदेशची रहिवासी असून तिच्या आईलाही क्रूर वागणूक दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. मुलीच्या म्हणण्यानुसार, काही लोकांनी तिच्यावर आणि तिच्या आईवर अत्याचार केले, पण कसा तरी ती आपला जीव घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाली. आरोपी कोण आहेत हे तिला माहीत नव्हते.

मुलीलाही तिच्या आईची काळजी आहे, जिचा ठावठिकाणा अद्याप अज्ञात आहे. एसपी म्हणाले की, पीडितेचे खूप रक्त वाहून गेले होते. गंभीर अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून त्यांना इंदोरला रेफर करण्यात आले.

Crime
Crime News:अल्पवयीन मोलकरणीला पिन टोचून रक्त चाटायला लावायची,आर्मी ऑफिसरच्या बायकोचं किळसवाणं कृत्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.