दरवर्षी फटाक्यांच्या (Firecrackers) अपघातामुळे डोळ्यांना जखमा होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यावेळी शहरातच २२० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
बंगळूर : शहरात दिवाळी सणादरम्यान (Diwali Festival) फटाके फोडताना खबरदारीच्या उपायांसाठी जनजागृती करण्यात आली असली तरी फटाक्यांमुळे १२० हून अधिक लोकांच्या डोळ्यांचे नुकसान झाले आणि १०० हून अधिक लोक जखमी झाले.