नवी दिल्ली- हरियाणाच्या फरीदाबादमध्ये एका १२ वीत शिकणाऱ्या मुलाचा कथित गोरक्षा करणाऱ्या आरोपींनी पाठलाग केला होता. त्यानंतर त्याला गोळ्या घालून ठार केलं होतं. गो तस्करीच्या संशयातून १९ वर्षीय आर्यन मिश्रा याला आरोपींनी मारल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, या प्रकरणी वडिलांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.
सियानंद मिश्रा यांना एकूण तीन मुलं आहेत. आर्यन सर्वात लहान मुलगा होता. तो १२ वीच्या वर्गामध्ये शिकत होता. आर्यन गो तस्करी करत असल्याच्या संशयावरून पाच गोरक्षकांनी त्याच्या पाठलाग केल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर त्याला अडवून त्याला दोन गोळ्या मारण्यात आल्या. यात त्याचा मृत्यू झाला आहे.