Accident News: लग्नाच्या वऱ्हाड्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात; १३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील राजगडमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. लग्नासाठी वऱ्हाड्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर उलटलण्याने भीषण अपघात झाला आहे.
Accident News
Accident NewsEsakal
Updated on

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील राजगडमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. लग्नासाठी वऱ्हाड्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर उलटलण्याने भीषण अपघात झाला आहे. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा आधिक जण जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये लहान मुलांसह, महिला आणि पुरूषांचा समावेश आहे.

राजगडमध्ये ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे, तर या घटनेत १५ जण जखमी झाले आहेत.

पिपलोडी, राजगड येथे रविवारी रात्री आठच्या सुमारास लग्नाच्या वऱ्हाड्यांनी भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना घडली. जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वऱ्हाडी राजस्थानमधील मोतीपुरा येथून कुलमपूरला जात होते. याच दरम्यान हा अपघात झाला आहे.

Accident News
Porsche Car Accident : ‘त्या’ला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा; बाल न्याय मंडळाचा आदेश

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोशल मीडिया एक्सवरती पोस्ट करत म्हटलं की, राजगडचे जिल्हाधिकारी हर्ष दीक्षित, पोलिस अधीक्षक आणि मंत्री नारायण सिंह पनवार घटनास्थळी उपस्थित आहेत. आम्ही राजस्थान सरकार आणि पोलिसांच्या संपर्कात आहोत. जखमींना राजगड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही गंभीर जखमींना उपचारासाठी भोपाळला नेण्यात आले आहे.

Accident News
Porsche Crash Case: अपघात प्रकरणानंतर अग्रवाल पती-पत्नीने कोणाच्या मध्यस्थीने डॉ. तावरेशी संपर्क साधला? पोलिस करणार तपास

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आणि सोशल मिडीया पोस्ट करत म्हटलं की, मध्य प्रदेशातील राजगढ येथे रस्ते अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करते.

Accident News
Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.