Delhi News : 'नोएडा'मध्ये 24 तासात 14 मृत्यू; मृत्यूचं नेमकं कारण काय?

मृतांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खुना नाहीत. त्यामुळे हे मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. नोएडा जिल्हा रुग्णालयाच्या सीएमएस रेणू अग्रवाल यांनी सांगितलं की, काल आमच्याकडे १४ मृत्यूचे प्रकरणं समोर आलेले आहेत. मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
Delhi News
Delhi Newsesakal
Updated on

नवी दिल्लीः दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवर तब्बल १४ लोकांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. हे सगळे मृत्यू हीटस्ट्रोकमुळे झाल्याचा अंदाज आहे. आरोग्य विभागाकडून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे.

सध्या उत्तर भारतात प्रचंड उष्णतेची लाट पसरली आहे. उष्णतेमुळे उष्माघाताचे प्रकार वाढले आहेत. मंगळवारी नोएडामध्ये वेगवेगळ्या भागांत तब्बल १४ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. काही मृतदेह पोलिसांनी तर काही मृतदेह नातेवाईकांनी रुग्णालयात नेले.

Delhi News
Abhishek Bachchan : बोरिवलीमध्ये अभिषेक बच्चनने घेतली 'इतक्या' करोडची प्रॉपर्टी ; सोशल मीडियावर होतेय चर्चा

मृतांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या खुना नाहीत. त्यामुळे हे मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. नोएडा जिल्हा रुग्णालयाच्या सीएमएस रेणू अग्रवाल यांनी सांगितलं की, काल आमच्याकडे १४ मृत्यूचे प्रकरणं समोर आलेले आहेत. मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Delhi News
Ajit Pawar: बारामती जिंकण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज, हाती घेतला महत्वाचा उपक्रम

उत्तर भारतातील पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, बिहार व हिमाचलप्रदेशातसुद्धा उष्ण तापमानात वाढ झाली आहे. या सर्व राज्यांमध्ये कमाल तापमान 41 अंश सेल्शियसपेक्षा अधिक आहे. हरीद्वारमध्ये सुद्धा कमाल तापमानाची नोंद 41 अंश सेल्शियस एवढी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.