पश्चिम बंगालमधील नादिया येथे 14 वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवरच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या- एका अल्पवयीन मुलीचा बलात्कारामुळे मृत्यू झाल्याची गोष्ट सांगितली जात आहे, त्याला तुम्ही बलात्कार म्हणाल का? ती मुलगी गरोदर का की तिचे अफेअर होते? हे जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला? त्यांनी एकाला अटक केलीय आणि मला सांगण्यात आलं आहे की मुलीते मुलासोबत प्रेमसंबंध होते. असे बंगालच्या मुख्यमंत्री म्हणाल्या आहेत.
5 एप्रिल रोजी एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला होता. पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, ती एका वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती जिथे तिच्यावर बलात्कार झाला आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या दबावाखाली मुलीचे शवविच्छेदन न करता जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. याच तृणमूल काँग्रेसचे नेते ब्रज गोपाल गोआला यांच्या 21 वर्षीय मुलावर मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
घटनेच्या पाच दिवसानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणावर सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मुलीचा मृत्यू 5 एप्रिलला झाला होता, मात्र पोलिसांना 10 एप्रिलला याची माहिती मिळाली. 5 एप्रिल रोजी मुलीचा मृत्यू झाला असता, तर मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिस तक्रार का दिली नाही? कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले, तर पोलिस पुरावे कुठून आणणार?"
पुढे बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "हे प्रेम प्रकरण आहे, ज्याची घरच्यांनाही माहिती होती. जर कोणी प्रेमात असेल तर आपण त्याला कसे रोखू शकतो? योगी सरकारवर टीका करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही इथे लव्ह जिहाद करत नाही. हे त्यांचे स्वत:चे स्वातंत्र्य आहे, पण काही चुकले तर पोलिस दोषींना अटक करतील. एका आपोपीला याआधीच अटक करण्यात आली आहे."
भाजपवर या प्रकरणाचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप करत ममता बॅनर्जी यांनी दररोज सकाळी मीडियामध्ये कोणती हेडलाइन चालवायची हे भाजप ठरवते. हे लोक तेलाच्या किमतीवर किंवा दिल्ली दंगलीवर किंवा NRC वर किती वेळा बोलले आहेत? दरम्यान, पिडीतेस न्याय मिळावा या मागणीसाठी भाजपने सोमवारी राणाघाटात 12 तासांच्या बंदची हाक दिली असून मूक आंदोलन केले. भाजप नेत्या अर्चना मजुमदार यांनीही पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.