पंजाब जिंकणाऱ्या 'आप'ला मोठा धक्का; 150 नेत्यांनी केला भाजपात प्रवेश

Arvind Kejriwal
Arvind Kejriwalesakal
Updated on
Summary

भारतीय राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) आम आदमी पार्टीनं (Aam Aadmi Party) मोठं यश मिळवलंय. पंजाबमध्ये एकहाती सत्ता घेत सरकार स्थापन केलंय. तर, गोव्यात पक्षानं खातं उघडलंय. त्यामुळं भारतीय राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. परंतु, असं असताना गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसलाय. पक्षातील सुमारे 150 नेते आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केल्याचं वृत्त आहे.

एवढंच नाही, तर काँग्रेसलाही (Congress) मोठा फटका बसला असून काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे, राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) एक दिवस आधीच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावरून परतले आहेत. असं असतानाच एवढ्या मोठ्या संख्येनं आप नेत्यांनी पक्ष राम-राम ठोकला आहे. त्यामुळं पक्षात चिंतेचा वातावरण निर्माण झालंय. आगामी काही महिन्यांत गुजरात, झारखंड आणि कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यापूर्वीचं पक्षाला हा धक्का मानला जात आहे.

Arvind Kejriwal
भाजपच्या उभारणीसाठी आम्ही खूप तपश्चर्या केलीय : अटलबिहारी वाजपेयी

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, गुजरात भाजपचे (Gujarat BJP) सरचिटणीस प्रदीपसिंह वाघेला म्हणाले, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे मुख्यमंत्री घरीही पोहोचले नसतील किंवा त्यांचं जेवणही झालं नसेल आणि त्यांच्या पक्षातील अनेक लोक भाजपात सामील झाले. यावरून ते गुजरातच्या जनतेला मूर्ख बनवू शकत नाहीत, हे स्पष्ट होतंय. त्यांच्या गुजरात दौऱ्याला काही अर्थ नाहीय, असा टोलाही वाघेलांनी केजरीवालांना लगावलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.