Fire in Forest : देशात तीन दिवसांत 16,840 आगीच्या घटना
नवी दिल्ली : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून भारतात उष्णतेची लाटेचा सामना नागरिकांना करावा लागत असून, बदलत्या हवामानामुळे उत्तर भारतातील बहुतांश राज्ये उष्णतेच्या लाटेत आहेत. एवढेच नव्हे तर, राजस्थान, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि मध्य भारतदेखील उष्णतेमुळे होरपळत असून, वाढत्या उष्णतेमुळे देशभरातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात आगीच्या घटनांचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या तीन दिवसात देशात 16,840 आगीच्या घटना घडल्या आहेत.
भारतीय वन सर्वेक्षणानुसार, 28 मार्च ते 30 मार्च दरम्यान देशातील जंगलांमध्ये जाळपोळीच्या जवळपास 16 हजार 840 घटनांची नोंद झाली आहे. त्यापैकी 211 प्रमुख घटना होत्या. यामध्ये मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड आणि झारखंडच्या जंगलांचा समावेश आहे. देशातील अनेक राज्यांतील जंगलांना लागलेल्या आगीमुळे वन्यजीव आणि वन्यजीव धोक्यात आले आहेत.
कुठे-कुठे लागल्या आगी
जम्मू-काश्मीर : रियासी जिल्ह्यातील जंगलात 20 मार्च रोजी आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर या आगीने उग्र रूप धारण करत अनेक हेक्टर क्षेत्राला वेढले. यामध्ये जंगलातील संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.
हिमाचल प्रदेश : पार्वती खोऱ्यातील जंगलात भीषण आगीची घटना घडली. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथील हिमनद्यशास्त्रज्ञांचे पथक संशोधन करण्यासाठी पार्वती व्हॅलीमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना जंगलात अनेक ठिकाणी आग लागल्याचे दिसले. काही वेळातच त्यांनी प्रशासनाला आगीची माहिती दिली. आगीने दोन दिवसांत भीषण रूप धारण केले होते.
राजस्थान : अलवरच्या सरिस्का व्याघ्र प्रकल्पात 27 मार्चला आग लागली होती. याआगीवर तीन दिवसांनंतर, दोन भारतीय हेलिकॉप्टर आणि 400 लोकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत 700 हेक्टर वनक्षेत्र नष्ट झाले होते. सुदैवाने या आगीत सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील प्राण्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
मध्य प्रदेश: बांधवगड व्याघ्र प्रकल्पात गेल्या 10 दिवसांत 121 ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. सतना जंगलातही जाळपोळीच्या 32 घटनांची नोंद झाली आहे.
छत्तीसगड : वनविभागाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी आतापर्यंत राज्यात 8,833 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत जंगलाला आग लागण्याच्या 800 हून अधिक घटना घडल्या आहेत. गेल्या 45 दिवसांत 16.87 हेक्टर वनक्षेत्र आगीत नष्ट झाले आहे.
आसाम : आठ दिवसांपूर्वी गुवाहाटीतील वशिष्ठ भागातील घनदाट जंगलात भीषण आग लागली होती. वनविभागाच्या पथकाने अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आगीत अनेक हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले.
उत्तराखंड : 18 मार्चपासून राज्यातील जंगलांमध्ये जाळपोळ करण्याच्या 115 घटना घडल्या आहेत. बामराडी ते सीमार या जंगलात 30 मार्च रोजी म्हणजेच बुधवारी रात्री भीषण आग लागली होती. मात्र, सकाळपर्यंत वनविभागाच्या पथकाने त्यावर मात केली. आगीत 20 हेक्टर जंगल नष्ट झाले. एका अहवालानुसार, 15 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत राज्यातील 180.02 हेक्टर जंगल आगीमुळे नष्ट झाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.