New Parliament Building: संसदेच्या नव्या बिल्डिंगच्या उद्घाटनावरून मोदींना घेरलं ! १९ पक्षांनी एकजूट दाखवत केली ही कृती

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर 19 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे.
New Parliament Building
New Parliament Building
Updated on

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर 19 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. महाराष्ट्रातून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस खासदार देखील कार्यक्रमासाठी जाणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. New Parliament Building

सर्व विरोधी पक्षांनी आपली भूमिका जारी केली आहे. संसदेच्या नवीन इमारतीचं काम पूर्ण झालेलं आहे. या इमारीतचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

परंतु त्यांच्या हस्ते उद्घानट करु नये, त्यांच्याऐवजी राष्ट्रपतींनी उद्घाटन करावं, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. देशाच्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर राज्यासह देशातील अनेक छोटे मोठे पक्ष बहिष्कार टाकत आहेत.(Marathi Tajya Batmya)

या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हे तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवे, असे ट्विट केल्यानंतर संसदेच्या नवीन इमारतीशी संबंधित वाद सुरू झाला. हे ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 21 मे रोजी केले होते.(Latest Marathi News)

आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस, डीएमके, तृणमूल काँग्रेसने, आम आदमी , सीपीआय या पक्षांसोबत इतर छोट्या पक्षांनी उद्घाटनावर भहिष्कार टाकला आहे.

New Parliament Building
Narendra Modi : लोकसभा निवडणूकीत मोदींना हा नेता देऊ शकतो टक्कर! ताज्या सर्व्हेत नाव आलं पुढं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांशी प्रकल्प म्हणून सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाकडे पाहिले जाते. जुन्या संसद भवना एवजी आता सेंट्रल व्हिस्टा इमारती हे नवे संसद भवन म्हणून ओळखले जाणार आहे. अनेक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या नव्या संसद भवनाचे उद्घाटन येत्या २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मात्र, या उद्घाटन सोहळ्यावरून आता राजकारण सुरू झाले आहे.

New Parliament Building
Rupali Chakankar: 'महाराष्ट्रातून २०२२ मध्ये बेपत्ता ५३५', राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणाल्या…

या भवनाचे उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावे अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च पद असून या पदाचा मान राखला जावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. यामुळे अनेक विरोधी पक्षांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर चर्चा केली असून या संदर्भात संयुक्त निवेदन जारी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.