Weather Update : दिल्ली, यूपी, आसाम, मेघालयसह 'या' 19 राज्यांत पावसाची शक्यता; महाराष्ट्रात कधी?

देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांत पाऊस कोसळत आहे.
Rain
RainSakal
Updated on
Summary

पुढील पाच दिवस संपूर्ण देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसल्याचं हवामान खात्याचं (Meteorology Department) म्हणणं आहे.

Weather Update : देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांत पाऊस कोसळत आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आज अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

त्याचवेळी, उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये 6 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता असून, त्यासाठी हवामान खात्यानं अलर्ट जारी केलाय.

ईशान्येकडील राज्यांच्या वातावरणाबाबत बोलताना हवामान खात्यानं आज पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाची शक्यता वर्तवलीये. तसंच पुढील पाच दिवस संपूर्ण देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसल्याचं हवामान खात्याचं (Meteorology Department) म्हणणं आहे.

Rain
Terrorist Organization : RSS चे नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; 30 जणांची नावं केली जाहीर

पुढील पाच दिवस कमाल आणि किमान तापमान सामान्य राहील. स्कायमेट हवामान अहवालानुसार, आज गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, हिमाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. ईशान्य भारत, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.

Rain
Kiccha Sudeep : दक्षिणेचा 'हा' मेगास्टार भाजपमध्ये प्रवेश करणार? आज मोठ्या घोषणेची शक्यता

तर नैऋत्य पंजाब, वायव्य राजस्थान, हरियाणाचा काही भाग, विदर्भ आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात हलका पाऊस पडू शकतो. दुसरीकडं, या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातही (Maharashtra) पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्याबरोबरच विदर्भातील अनेक भागात 6, 7 आणि 8 एप्रिलच्या सुमारास पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.