3 डिसेंबर 1971 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये हे युद्ध सुरु झाले होते. 16 डिसेंबरपर्यंत हे युद्ध सुरु होते. भारतीय जवानांच्या पराक्रमामुळे अवघ्या 13 दिवसांत पाकिस्तानने गुडघे टेकले होते. या युद्धातील भारतीय नौदलाची रणनिती आणि पराक्रम आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भारतीय नौदलानं आखलेली योजना हटके होती आणि विचार करायला भाग पाडणारी होती. नौदलानं आखलेली योजना आजही सर्वांना शिकवण देते, असं नौदल प्रमुख ॲडमिरल करमबीर सिंह म्हणाले.
अॅडमिरल सरदारीलाल मथरादास नंदा यांच्या नेतृत्वात पाकिस्तानमधील कराची बंदराचा धुव्वा उडवला होता. या हल्ल्याच्या आठवणी जागवण्यासाठी लंडनमधील भारतीय उच्चायोगाद्वारे आयोजित वेबिनारमध्ये नौदल प्रमुख ॲडमिरल करमबीर सिंह बोलत होते. यावेळी त्यांनी 1971 मधील युद्धामध्ये नौदलानं केलेल्या कामगिरीचं पुन्हा वर्णन केलं. युद्धासाठी धोरणात्मक योजना आखणे, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या युद्ध बळावर समोरच्याला चारीमुंड्या चीत करण्यासाठी आखलेली योजना आजही सर्वांना शिकवण देऊन जाते. नौदलाच्या कामगिरीमुळे पाकिस्तान चारीमुंड्या चीत झालं होतं, 1971 युद्ध महत्वाचं होतं. कारण, नवीन राष्ट्र बांगलादेश निर्माण होण्याचं माध्यम बनलं. 1971 च्या युद्धामधील अर्धी पिढी सध्या हयात नाही. मात्र, त्यावेळी नौदलानं केलेली कामगिरी आज आणि भविष्यासाठीही महत्वाचा धडा देणारी आहे, असं करमबीर सिंह म्हणाले.
1971 च्या युद्धात भारताच्या लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी केलेल्या अतुलनीय पराक्रमामुळे पाकिस्तान चारीमुंड्या चीत झाला होता. मात्र आतापर्यंतच्या युद्धांपैकी 1971च्या युद्धातील भारतीय नौदलाचा पराक्रम हा उल्लेखनीय असा आहे. 1971 साली झालेल्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान, 'ऑपरेशन ट्रायडंट' नावाने मोहीम हाती घेत नौदलाने पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडले. भारतीय नौदलाने पाकिस्तानमधील महत्त्वाचे बंदर असलेल्या कराचीचा धुव्वा उडवला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.