Nuclear Power Plant: भारताचा पहिला स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु; पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

1st India Made Nuke Plant Runs In Full Capacity
1st India Made Nuke Plant Runs In Full Capacity ESAKAL
Updated on

1st India Made Nuke Plant Runs In Full Capacity

नवी दिल्ली- भारतातील पहिले देशातच निर्माण करण्यात आलेले अणुऊर्जा प्रकल्प Nuclear power plant पूर्ण क्षणतेने सुरु झाले आहे. गुजरातच्या काक्रापार येथे हा प्रकल्प असून याची क्षमता ७०० MV आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावरुन याची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.

काक्रापार अॅटोमिक पॉवर प्रोजेक्टचे Kakrapar Atomic Power Project (KAPP) ३० जून रोजी व्यायसायिक काम सुरु झाले होते.पण, प्रकल्प आतापर्यंत ९० टक्के क्षमतेने चालत होता. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन म्हटलं की, 'देशातील महिला स्वदेशी ७०० MWe क्षमतेचा काक्रापूर अणुऊर्जा प्रकल्प युनिट-३ गुजरातमध्ये पूर्ण क्षमतेने सुरु झाला आहे. हा देशातील अशा प्रकारचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. आपले वैज्ञानिक आणि अभियंत्यांचे याबाबात अभिनंदन.'

1st India Made Nuke Plant Runs In Full Capacity
Rahul Gandhi: जागतिक वृत्तपत्रांनी आज अदानींच्या बातम्या छापल्या, हा पैसा कुणाचा?; राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल

एनपीसीआयएल The Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL) ७०० MW क्षमतेचे दोन प्रेझराईज हेवी वॉटर रिअॅक्टर pressurized heavy water reactors (PHWRs) काक्रापार येथे उभारत आहेत. याआधी २२० MW क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प येथे उभारण्यात आलेले आहेत. सूत्रांनुसार काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प ९७.५६ टक्के सुरु झाला आहे.

माहितीनुसार, एनपीसीआयएल संपूर्ण देशात ७०० MW क्षमतेचे १६ अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. यासाठी आर्थिक तरतूद आणि प्रशासकीय मंजुरी मिळाल्या आहेत. सध्या ७०० MW क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्पांचे राजस्थानच्या रावतभाटा (RAPS 7 and 8) आणि हरियाणातील गोरखपूर (GHAVP 1 and 2) येथे निर्मिती कार्य सुरु आहे.

1st India Made Nuke Plant Runs In Full Capacity
Sakal Podcast :राहुल गांधींची मोदी-अदानी संबंधांवर टीका ते संसदेच्या विशेष सत्राचं आयोजन

सरकारने आतापर्यंत स्वदेशात निर्मित अशा १० अणुऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीला परवानगी दिलेले आहे. चार ठिकाणी हे प्रकल्प उभारले आहेत. यात हरियाणातील गोरखपूर, मध्य प्रदेशातील चुटका, राजस्थानमधील माही बनस्वारा आणि कर्नाटकातील कैगा या ठिकाणांचा समावेश आहे.

youtube.com/watch?v=hKdP2pPwTOA

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.