एकाच पक्षाकडून एका जागेसाठी 2 उमेदवार..बॅकअप कँडिडेट काय असतो? सूरतमध्ये काँग्रेसला पडलं महागात!

What is a backup candidate: सोमवारी ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी देखील AIMIM कडून उमेदवारी अर्ज दाखल करुन आश्चर्यचकित केलं.
backup candidate:
backup candidate:
Updated on

नवी दिल्ली- देशात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलंय. उमेदवार तिकीट मिळाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. हैद्राबादमधून एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे निवडणूक लढवत आहेत.

पण, सोमवारी ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी देखील AIMIM कडून उमेदवारी अर्ज दाखल करुन आश्चर्यचकित केलं. भावाने अर्ज दाखल केला असताना दुसऱ्या भावाला अर्ज का दाखल करावा लागला असा प्रश्न लोकांना पडला होता? (2 candidates for one seat from the same party what is a backup candidate Surat Congress)

दुसऱ्या एका प्रकरणात, सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराची मतदानाआधीच बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने आणि अन्य ८ अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक आयोगाने भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना विजयी घोषित केले.

त्यामुळे काँग्रेसने पर्यायी उमेदवार किंवा बॅकअप उमेदवार दिला असता तर अशी वेळ आली नसती अशी चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर बॅकअप उमेदवार किंवा पर्यायी उमेदवार म्हणजे काय हे आपण पाहुया.

backup candidate:
Loksabha Election: आता फक्त ३९९! लोकसभा निवडणुकीत भाजपने उघडलं खातं, सुरतमध्ये उधळला विजयाचा गुलाल, काय घडलं नेमकं ?

काय असतं पर्यायी उमेदवार?

निवडणूक अधिकारी उमेदवारांचा अर्ज तपासत असतात. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास निवडणूक अधिकाऱ्यांकडून अर्ज बाद केला जातो. एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यास देखील पर्यायी किंवा बॅकअप उमेदवाराची आवश्यकता भासते. अनेक मोठे पक्ष सर्वसाधारणपणे उमेदवारासाठी दुसरा एक बॅकअप उमेदवार देत असतात. या पर्यायी उमेदवाराचे नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंतच राहते.

backup candidate:
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतील? प्रसिद्ध अर्थतज्त्रांनी केलं भाकित

जेव्हा मुख्य उमेदवाराचे नामांकन निवडणूक आयोगाकडून वैध ठरवले जाते तेव्हा पर्यायी उमेदवाराचा अर्ज अमान्य घोषित केला जातो. काहीवेळा अपक्ष म्हणून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला जातो. चुरशीची लढत असणाऱ्या मतदारसंघामध्ये असे अपक्ष उमेदवार उभे केले जातात. असदुद्दीन ओवैसी यांचा अर्ज बाद झालाच तर त्यांच्या जागी अकबरुद्दीन ओवैसी हे उमेदवार असू शकतील. पण, हे केवळ एक खबरदारी म्हणून केलं जातं. (Lok Sabha Election 2024)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.