Vaishno Devi Stampede : 12 जणांच्या मृत्यूनंतर मोदींकडून मदतीची घोषणा

Vaishno Devi stampede : या घटनेत १२ लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत.
Vaishno Devi stampede
Vaishno Devi stampedeTeam eSakal
Updated on

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu Kashmir) कटरा येथील माता वैष्णो देवी भवन येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केली आहे. तर या घटनेतील सर्व जखमींना पंतप्रधान आपत्ती प्रतिसाद निधीतून (PMNRF) 50,000 रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

Vaishno Devi stampede
धक्कादायक! वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, 12 भाविकांचा मृत्यू

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केलं आहे. 'माता वैष्णो देवी भवन येथे झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले. शोकग्रस्त कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, जखमी लवकर बरे होवोत. अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Vaishno Devi stampede
कालीचरणला 13 जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही कारणावरून झालेल्या वादातून भाविकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. कटरा हॉस्पिटलचे बीएमओ डॉ. गोपाल दत्त यांनी मृत्यूबद्दलची माहिती दिली. सध्या जखमींना नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. नववर्षानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.