2 Planes On 1 Runway Alert Woman Pilot Prevents Delhi Airport Tragedy
नवी दिल्ली- दिल्ली विमानतळावर बुधवारी मोठा अपघात होता होता टळला आहे. अहमदाबादहून आलेले विस्तारा विमान आणि उड्डाण भरण्यासाठी तयार असलेले दुसरे विमान यांच्यामध्ये अपघात होता होता थोडक्यात टळला. विस्तारा विमानाला उतरण्यासाठी आणि दुसऱ्या विमानाला उड्डाण करण्यासाठी एकाचवेळेस परवानगी देण्यात आली होती. दोन्ही विमानांमध्ये मिळून ३०० प्रवासी होते.विस्तारातील वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय.
अहमदाबाद-दिल्ली विमानाला रणवेवर उतरण्यासाठी एअर ट्राफिक कंट्रोलने परवानगी दिली. पण, त्याचवेळी दिल्ली-बागडोगरा विमानाला उड्डाण करण्याच्या सुचना देण्यात आल्या. ४५ वर्षीय वैमानिक सोनू गील यांच्या समय सुचकतेमुळे अपघात टळला आहे. दोन्ही विमान एकमेकांपासून १.८ किलोमीटर अंतरावर होते. वैमानिक सोनू गील यांनी एअर ट्राफिक कंट्रोलला याची सुचना दिली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती.
डीजीसीएच्या Directorate General of Civil Aviation (DGCA) माहितीनुसार, विस्तारा विमान VTI926 रणवे 29L वर उतरले आणि एटीसीकडून त्याला 29R रणवे क्रॉस करण्याच्या सुचना देण्यात आल्या. पण, एटीसी अधिकाऱ्यांकडून VTI926 ला सुचना दिल्याचा विसर पडला. अधिकाऱ्यांनी VTI725 विमानाला रणवे 29R वरुन उड्डाणाला परवानगी दिली. त्यामुळे दोन्ही विमानांची टक्कर होण्याची शक्यता निर्माण झाली. पण, विस्तारा विमान VTI926 कडून आलेल्या इनपूटमुळे एसीटीकडून VTI725 विमानाचे उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
डीजीसीएने एटीसी अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. दिल्ली-बागडोगराला जाणारे विमान तात्काळ थांबवण्यात आले. त्यानंतर इंधन पुन्हा एकदा भरुन विमानाला मार्गावर सोडण्यात आले. माहितीनुसार, जेव्हा बागडोगराला जाणाऱ्या विमानाच्या वैमानिकांनी फ्लाईट उड्डाण करणार नसल्याचे प्रवाशांना सांगितले तेव्हा प्रवाशांची बाचाबाची केली. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागला. विमानांच्या ऑपरेशन दरम्यान अधिक नियंत्रणाची गरज यामुळे अधोरेखीत झाली आहे. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.