2000 Note News : २०००च्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत सरकार ने वाढवली? अर्थराज्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक खासदारांनी केली होती विचारणा
Rupees 2000 rupees
Rupees 2000 rupeessakal
Updated on

2000 Note News : देशात 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची मुदत वाढवून मिळणार असल्याचे संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात तारीख नमूद नसली तरी मुदत वाढणार असे म्हटले जात आहे. अश्यातच केंद्र सरकारने याबाबाद आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

रिझर्व्ह बँकेने २९ मे २०२२ रोजी 2,000 रुपयाच्या नोटा देशातून रद्द केल्या होत्या. यावेळी या नोटा नागरिकांनी ३० सप्टेंबर पर्यंत नागरिकांनी बँकेत जमा कराव्यात असे म्हटले होते किंबहुना तशी घोषणाच केली होती.

Rupees 2000 rupees
2000 Bank Note: आयडी प्रूफशिवाय 2000च्या नोटा बदलताना येणार का? सुप्रीम कोर्टानं स्पष्टच सांगितलं

मात्र या नोटा जमा करण्याची मुदत वाढवून मिळेल का? याची माहिती द्यावी अशी मागणी संसदीय अधिवेशनात करण्यात आली होती.संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुप्रिया सुळे (supriya sule ) यांच्यासह अनेक खासदारांनी याबाबत विचारणा केली होती. खासदारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (pankaj chaudhari ) यांनी उत्तर दिले आहे.

Rupees 2000 rupees
SAKAL Exclusive: : F & O ट्रेडिंग शिकवणीतून विजय ठाकरेंचे तरुणाईला मार्गदर्शन

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही अंतिम मुदत दिली आहे. तुमच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्या मुदतीपूर्वी बँकांमध्ये जमा करा. कारण सरकार 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची मुदत वाढवणार नाही.असे उत्तर सरकारने दिले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मुदतीत कोणताही बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.