Mamata Banerjee : विरोधकांच्या ऐक्याला धक्का! 2024 लोकसभा निवडणुकीबाबत ममतांचा मोठा निर्णय

Narendra Modi, Rahul Gandhi, mamata banerjee
Narendra Modi, Rahul Gandhi, mamata banerjee
Updated on

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील सागरदिघी विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने टीएमसीचा पराभव करून नवा इतिहास रचला आहे. तब्बल दहा वर्षांनंतर सागरदिघी मतदारसंघातून टीएमसी बाहेर पडली आहे. काँग्रेसचे उमेदवार बायरन बिस्वास यांनी टीएमसीचे देबाशीष बॅनर्जी यांचा २२ हजार मतांनी पराभव केला.

Narendra Modi, Rahul Gandhi, mamata banerjee
Kasba By Election Result : विजयानंतर रवींद्र धंगेकर केसरीवाड्यात! टिळक कुटुंबीयांचे मानले आभार...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या विजयामुळे नाराज आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी म्हणाल्या की, तृणमूल काँग्रेस 2024ची निवडणूक एकट्याने लढणार आहे.

Narendra Modi, Rahul Gandhi, mamata banerjee
Kasba By Election Result : विजयानंतर रवींद्र धंगेकर केसरीवाड्यात! टिळक कुटुंबीयांचे मानले आभार...

सागरदिघी पोटनिवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांचे मोठे विधान गुरुवारी समोर आले. काँग्रेसचा विजय अनैतिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तृणमूलला पराभूत करण्यासाठी माकपसह काँग्रेस पक्षाने भाजपशी करार केला, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

दरम्यान पोटनिवडणुकीतील पराभवासाठी आपण कोणालाही जबाबदार धरत नाहीत. मात्र आम्हाला पराभूत करण्यासाठी एक अनैतिक युती झाली होती, असंही ममता यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.