Gujarat Riots : गुजरात दंगलीप्रकरणी २२ आरोपींची निर्दोष मुक्तता!

Gujarat Riots
Gujarat Riots
Updated on

Gujarat Riots : गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या गोध्रा दंगलीतील २२ आरोपांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. गुजरातमधील पंचमहल न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या दंगलीत दोन मुलांसह अल्पसंख्याक समाजातील १७ लोकांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान सबळ पुरावे नसल्याचे कारण देत २२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तक्रारदारांच्यामते पीडितांची २८ फेब्रुवारी २००२ रोजी हत्या करण्यात आली होती आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचे मृतदेह जाळण्यात आले होते.

२७ फेब्रुवारी २००२ रोजी, पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा शहराजवळ जमावाने साबरमती एक्स्प्रेसची एक बोगी जाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्याच्या विविध भागात जातीय दंगली उसळल्या होत्या. साबरमती एक्स्प्रेसच्या बोगीत ५९ प्रवासी मरण पावले होते, त्यापैकी बहुतांश अयोध्येहून परतणारे 'कारसेवक' होते.

Gujarat Riots
Lakhimpur Kheri : आरोपी आशिष मिश्राला SC कडून अटीशर्थींसह अंतरिम जामीन मंजूर

पंचमहाल जिल्ह्यात हालोल गावात झालेल्या हिंसाचारानंतर एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आणखी एका पोलीस निरीक्षकाने घटनेच्या जवळपास दोन वर्षांनी नवीन गुन्हा नोंदवला आणि दंगलीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली २२ जणांना अटक केली होती.

Gujarat Riots
Uddhav Thackrey : दादा भूसेंना धक्का देत ठाकरेंनी खेळली नवी खेळी; भाजपचा उमेदवार गळाला

बचाव पक्षाचे वकील गोपालसिंह सोलंकी म्हणाले, “अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्ष त्रिवेदी यांच्या न्यायालयाने मंगळवारी सर्व २२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली, त्यापैकी आठ जणांचा खटल्याच्या सुनावणीदरम्यान मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील हालोल गावात दोन मुलांसह अल्पसंख्याक समाजातील १७ लोकांची दंगल करून हत्या केल्याप्रकरणी न्यायालयाने सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे." 

Gujarat Riots
Maharashtra Politics: शिंदे फडणवीसांच्या अडचणीत वाढ होणार? शपथविधी गोंधळाची धक्कादायक माहिती उघड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.