GST Tax: देशातील 24 आयातदारांनी चुकवला तब्बल 11 हजार कोटी रुपयांचा कर, सरकारणे पाठवली नोटीस

आतापर्यंत सुमारे 24 प्रकरणांमध्ये सुमारे 11,000 कोटी रुपयांची चोरी आढळून आली आहे
GST Tax
GST TaxSakal
Updated on

GST Tax: डायरेक्टरेट जनरल ऑफ GST इंटेलिजेंस (DGGI) आणि डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI) यांना 24 मोठ्या आयातदारांकडून ₹11,000 कोटींच्या GST चोरीचे प्रकरण सापडले आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, आतापर्यंत सुमारे 24 प्रकरणांमध्ये सुमारे 11,000 कोटी रुपयांची चोरी आढळून आली आहे आणि या संदर्भात सात युनिट्सना नोटिसा पाठवल्या आहेत. गेल्या 20 दिवसांत मुंबई, कोलकाता आणि चेन्नई अधिकारक्षेत्रातील आयातदारांना या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

वृत्तानुसार, एजन्सींनी इतर आयातदारांनाही नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या कंपन्यांनी कर चुकवला आहे ते स्टील, औषधी दागिने आणि कापड व्यवसायात गुंतलेले आहेत. एजन्सींनी इनपुट टॅक्स क्रेडिटचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

Advanced Analytics in Indirect Taxation (ADVIT) द्वारे तयार केलेल्या डेटाच्या आधारे, करचोरी पकडण्यासाठी तयार केलेल्या प्रणालीत असे आढळून आले की काही आयातदार GST मध्ये फेरफार करून कर चुकवत आहेत.

Advanced Analytics in Indirect Taxation (ADVIT) ची उपयुक्तता पाहून सरकार ही प्रणाली आणखी मजबूत करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी व्यवस्थेतही काही बदल करण्यात येत आहेत. बोगस जीएसटी नोंदणी आणि चुकीच्या इनपुट टॅक्स क्रेडिट्स शोधण्यासाठी 16 मे पासून दोन महिन्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे.

GST Tax
Centre Issues Order: 'ती' गोष्ट ऑनलाइन विकल्यामुळे Flipkart-Amazon सह 5 ई-कॉमर्स वेबसाइटवर कडक कारवाई

सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क (CBIC) चे अध्यक्ष विवेक जोहरी यांनी 2 मे रोजी सर्व फील्ड फॉर्मेशन्सना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "नवीन कार्यपद्धती महसूल आणि आयात आणि निर्यात दोन्हीमधील ट्रेंडचे सखोल विश्लेषण करण्यास सक्षम आहे.

प्रगत डेटा सायन्स मॉडेल्सचा वापर करून सीमाशुल्क तसेच GST दोन्ही बाजूंवरील विसंगती शोधून काढून या कार्यपद्धती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि संभाव्य गळती दूर करण्यात मदत करतील,"

GST Tax
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.