26/11 Mumbai Attack : ताजवर हल्ला अन राज्याच्या राजकारणात भूकंप; जाणून घ्या काय होते ते नेमके प्रकरण

26 नोव्हेंबर हा मुंबईकरांच्या आयुष्यातील काळा दिवस
26/11 Mumbai Attack
26/11 Mumbai Attack esakal
Updated on

26/11 Mumbai Attack : देशाची आर्थिक राजधानी, असंख्य लहान मोठ्या उद्योगांनी गजबलेली मुंबई संध्याकाळी तर आणखीच मोहक, मायावी रुप घेते. अशाच एका संध्याकाळी आजच्या 26 नोव्हेंबर या दिवशीच, 14 वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी मुंबानगरीतल्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करत अवघ्या देशाला वेठीस धरले होते.

26/11 Mumbai Attack
Mumbai Attack : मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यातील पोलिस, जवानांचा लढा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा

26 नोव्हेंबर हा मुंबईकरांच्या आयुष्यातील काळा दिवस कोणीही विसरू शकणार नाही. कारण, या दिवशी दहशतवाद्यांनी ताज हॉटेल आणि ट्रायडेंट हॉटेलबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात १६६ नागरिकांना जीव गमवावा लागला होता. तर, मुंबई पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांना वीरमरण आले होते. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. थरकाप उडवून देणाऱ्या या घटनेला आज १४ वर्ष पूर्ण होत आहेत.

26/11 Mumbai Attack
Mumbai 26/11 attacks : शूरवीरांच्या शौर्याची तेवत राहिल 'मशाल'

एकीकडे अचानक झालेल्या हल्ल्यातून लोक सावरलेही नव्हते. तर, दुसरीकडे राज्याच्या राजकारणात भुंकंप झाला. ते म्हणजे, या हल्ल्यानंतर टीकेचे धनी होत महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमूख आणि उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर.आर. पाटील यांनी राजिमाना दिला. आर आर आबांनी उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदाचाही तडकाफडकी राजीनामा दिला.

26/11 Mumbai Attack
26/11 Mumbai attack:चूक नेमकी कोणाची? ताज वरील हल्ल्यानंतर 'रॉ' चीफ देणार होते राजीनामा

26 /11 चित्रपटावरून राजकारण तापलं आणि विलासरावांनी राजीनामा दिला

विलासराव देशमुख यांचे नाव घेतले की, डोळ्यासमोर उभे राहते हसऱ्या चेहऱ्याचे दिलखुलास व्यक्तिमत्व असलेले व्यक्तिमत्व. याच विलासरावांनी राजकीय जीवनाची सुरवात आपल्या बाभळ गावच्या सरपंच पदापासून करत थेट केंद्रीय मंत्रीपदापर्यंत मजल मारली.

26/11 Mumbai Attack
26/11 Mumbai Terror Attacks: भारताला मोठे यश, तहव्वूर राणाचे होणार प्रत्यार्पण

दरम्यानच्या काळात त्यांनी महाराष्ट्राचे २ वेळा मुख्यमंत्री पद सुद्धा भूषवले. वसंतराव नाईक यांच्यानंतर महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुखमंत्री राहिलेले हुरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे विलासराव होते. अशा या बहुआयामी व्यक्तीमत्वावर मुंबई दहशतवादी हल्ल्याबाबत गंभीर नसल्याचा आरोप करण्यात आला. याला कारणही तसेच होते.

26/11 Mumbai Attack
26/11 Attack: संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी समितीची मुंबईत बैठक

ताज हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यावर लगेचच त्यावर चित्रपट बनवण्याचा विचार घेऊन दिग्दर्शक राम गोपाल वर्मा अभिनेता रितेश देशमूख आणि तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमूख थेट ताज हॉटेलमध्ये पोहोचला.

https://www.esakal.com/premium-article/premium-finance/what-to-do-if-tds-is-deducted-from-fixed-deposit-principal-amount-asg68?utm_source=Premium+Article+internal&utm_medium=Premium+Article+internal

राम गोपाल वर्मा यांनी या चित्रपटासाठी रितेशला फायनल केल्याचे वृत्तही आले. त्यामूळे लेकाच्या करिअरसाठी दिग्दर्शकाला घेऊन ताज हॉटेलची पाहणी करायला गेलेले विलासराव देशमूख अडचणीत आले. सर्वच बाजूने त्यांच्यावर टीका होऊ लागली. बॉलिवूडनेसुद्धा राम गोपाल वर्मा यांच्यावर हल्लाबोल केला. त्यामूळे विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री पदाचा थेट राजीनामा द्यावा लागला.

26/11 Mumbai Attack
Winter Recipe: वर्षेभर टिकणारा आवळ्याचा मोरावळा कसा तयार करायचा?

आर आर आबांच्या राजीनाम्याला ही गोष्ट ठरली कारणीभूत

आर. आर. पाटील यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये सुरवातीला ग्रामविकास मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. गाडगे महाराज स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून आर आर पाटील यांनी वेगळी ओळख निर्माण केली. पुढे राज्याचं गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही त्यांनी जबाबदारीने सांभाळले. गृहमंत्री असतांना डान्सबार बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन आबांनी अनेक संसार सावरले. डान्स बार बंद करण्याच्या निर्णयाला विरोधही झाला पण आबांनी ठोस पाऊले उचलत ते निर्णय तडीस नेले.

26/11 Mumbai Attack
Winter Season Food : थंडीचा महिना...गरम अन् पौष्टिक आहार खा!

दहशतवादी हल्ला झाल्याने संपूर्ण देशात दुखवटा जाहीर करण्यात आला होता. अशावेळी राज्याचे गृहमंत्री पद सांभाळणाऱ्या आर आर आबांनी दहशतवादी हल्ल्याला किरकोळ गोष्ट असल्याचे म्हटले. पत्रकार परिषदेत ‘बडे बडे शहरो में ऐंसी छोटी छोटी बाते होती रहती है’, हा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ मधील डायलॉग त्यांनी मारला. आणि त्यावरूनच गदारोळ सुरू झाला.

26/11 Mumbai Attack
Walk After Food : तरूणांनी जेवल्यानंतर कधी अन् किती वेळ करावी शतपावली?

राज्यावर आलेल्या या गंभीर प्रसंगाला गृहमंत्रीच हलक्यात घेत आहेत, त्यांना जबाबदारीचे काही भान आहे की नाही, अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली. विरोधकांनी तर त्यांना चांगलेच फैलावर घेतले. जनतेकडूनही त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. अखेर राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्या सांगण्यावरून आर आर आबांनी उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

26/11 Mumbai Attack
Vitamin D Recipe : उन्हात न बसताही 'हा' पुलाव खाऊन पूर्ण करा व्हिटॅमिन डी ची कमतरता

सध्या अनेक नेते बेताल वक्तव्य करत सुटतात. त्यांच्यावर टीका होते. पण, ते बोलतात आणि विसरून जातात. पण, आबा तसे नव्हते. केलेल्या वक्तव्यावर त्यांनी माफीही मागितली आणि राजीनामाही दिला. थोड्या दिवसांनी ते पुन्हा राजकारणात सक्रीय झाले. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आजही सामान्य जनतेच्या हिताचे ठरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.