शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आलमट्टी धरणातून सोडण्यात येणार 2.75 TMC पाणी; उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय

आलमट्टी आणि नारायणपूर या दोन्ही जलाशयांची एकूण पाणी साठवण क्षमता १५४ टीएमसी आहे.
Almatti Dam Farmers DK Shivakumar
Almatti Dam Farmers DK Shivakumaresakal
Updated on
Summary

राज्यातील २२३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. कृष्णा नदीच्या वरच्या भागातील ९२ तालुके दुष्काळग्रस्त आहेत. सध्यातरी पावसाची शक्यता कमी आहे.

बंगळूर : कृष्णा खोऱ्यातील बागलकोट, गुलबर्गा आणि विजापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अलमट्टी धरणातून (Almatti Dam) २.७५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. या प्रदेशातील मिरची व इतर पिकांच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

कृष्णा अपर बँक प्रकल्पांतर्गत रायचूर, बागलकोट, यादगिरी यासह विविध जिल्ह्यांतील शेतकरी, आमदार, विधान परिषद सदस्य, मंत्री, जिल्हाधिकारी, पाटबंधारे अधिकारी यांची काल रात्री व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘उगवणाऱ्या मिरची पिकाला पाणी देण्याची मागणी करत शेतकरी कार्यालयासमोर खड्डा खोदून त्यामध्ये बसून आंदोलन करत आहेत. सरकारला अशाप्रकारे ब्लॅकमेल करणे चांगले नाही, असे मी त्यांना सांगितले.

Almatti Dam Farmers DK Shivakumar
कोकणातील पांडवकालीन टाकेश्वर मंदिराच्या खोदकामात सापडल्या ऐतिहासिक वीरगळ, सतीशीळा; दगडावर कशाची आहे मूर्ती?

आलमट्टी आणि नारायणपूर या दोन्ही जलाशयांची एकूण पाणी साठवण क्षमता १५४ टीएमसी आहे, परंतु सध्या दोन्ही जलाशयांमधून केवळ ४७.०१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी व इतर गरजांसाठी ३० जूनपर्यंत ३८.७८८ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. बाष्पीभवन परतीच्या पाण्याच्या वापरासाठी ३.९० टीएमसी पाण्याची बचत करायची आहे.

Almatti Dam Farmers DK Shivakumar
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याला मोठा दिलासा! कोल्हापूर, सांगली पूरव्यवस्थापनास 'जागतिक बँके'ची मंजुरी; काय आहे प्रकल्प?

अलमट्टीतून नारायणपूर जलाशयात पाणी वाहून गेल्यावर पुरवठा खंडित करण्यात होईल. या सर्व बाबींचा विचार करता एकूण ४४.१८८ टीएमसी पाणी राखीव ठेवावे. फक्त २.८ टीएमसी वापरासाठी उपलब्ध आहे. यातील २.७५ टीएमसी पाण्याचा तातडीने विसर्ग होणार आहे. सोडलेले पाणी जलाशय प्रदेशाच्या शेवटच्या भागापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शेतकरी नेते, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी व पोलिसांनी पार पाडावी.’

राज्यातील २२३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. कृष्णा नदीच्या वरच्या भागातील ९२ तालुके दुष्काळग्रस्त आहेत. सध्यातरी पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे जलाशयातील पाणी टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.

Almatti Dam Farmers DK Shivakumar
'वंचित'नंतर सांगली मतदारसंघावर काँग्रेसचा दावा; पृथ्वीराज चव्हाणांनी जाहीर केला उमेदवार, कोणाला मिळाली संधी?

‘नदी जोड’च्या अभ्यासासाठी केंद्रीय शिष्टमंडळ येणार

देशातील नदी संरेखनाच्या मुद्द्यावर अभ्यास करणारे केंद्रीय संसद सदस्यांचे एक शिष्टमंडळ राज्यातील नदी जोड प्रकल्पाच्या अभ्यासासाठी १७ आणि १८ जानेवारीला राज्याचा दौऱ्यावर येणार आहे. नदीचे संरेखन हा देशभरात चर्चेचा मोठा विषय आहे. याबाबत सविस्तर चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत ३१ खासदारांचे हे शिष्टमंडळ प्रकल्पाचे संरेखन आणि सिंचनाच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहे, अशी माहिती शिवकुमार यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.