2G Spectrum Scam: 'टू जी स्पेक्ट्रम' घोटाळ्याची बंद झालेली फाईल पुन्हा उघडणार? निर्दोष सुटलेले 'हे' नेते येणार पुन्हा अडचणीत

यामुळं या प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेले तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा आणि डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
2G Spectrum Scam
2G Spectrum Scam
Updated on

नवी दिल्ली : बहुचर्चित टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची बंद झालेली आता पुन्हा उघडण्याची चिन्ह आहेत. कारण सीबीआयानं यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली असून दिल्ली हायकोर्टानं या याचिकेवर सुनावणी करण्यास होकार दिला आहे. यामुळं या प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेले तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा आणि डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. (2G Spectrum Scam closed file may be reopened CBI petition accepted by Delhi High Court)

2G Spectrum Scam
Vijay Shivtare: शिवतारे भाजपच्या कमळ चिन्हावरही लढण्यास तयार; मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला नवा प्रस्ताव

न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांनी म्हटलं की, रोकॉर्डवर आलेली सामग्री आणि पक्षकारांच्या वकिलांच्या युक्तीवादाच्या आधारे सीबीआयकडून महत्वाचं प्रकरण असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. तसेच अपिलावर विस्तारानं सुनावणीची आवश्यकता असल्याचंही म्हटलं आहे. खंडपीठानं याचबरोबर अपिलाला परवानगी दिली आहे. तसेच हे प्रकरण मे महिन्यात सुनावणीसाठी सुचीबद्ध करण्याचे निर्देश दिले. (Latest Marathi News)

2G Spectrum Scam
Loksabha Election 2024: उमेदवारांसाठी होत्या रंगीत मतपेट्या! वाचा भारतातील निवडणुकांचे रंजक किस्से

सीबीआयनं कनिष्ठ कोर्टाच्या निकालावरील गुण-दोषांच्या आधारे विचार करण्यासाठी सन २०१८ मध्ये अपील केलं होतं. या प्रकरणी न्यायमूर्तींनी गेल्या १४ मार्चला आपला निकाल सुरक्षित ठेवला होता. विशेष कोर्टानं २१ डिसेंबर २०१७ रोजी ए. राजा, कनिमोळी आणि इतर दोघांना टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित सीबीआय आणि ईडीच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.