ढाब्यावर जेवण करून गावाकडं परताना 3 मित्रांचा जागीच अंत

Car Accident
Car Accidentesakal
Updated on
Summary

पोलिसांनी रक्तानं माखलेल्या तरुणांना अथक प्रयत्नानंतर कारमधून बाहेर काढले आहे.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सागर (Sagar) जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ता अपघातात (Car Accident) तिघांचा मृत्यू झालाय. समोरून आलेल्या अज्ञात वाहनानं कारला जोरदार धडक दिलीय. या कारमध्ये तीन तरुण होते. ही धडक इतकी जोरदार होती की, तिघांचा जागीच मृत्यू झालाय. हा अपघात घडल्यानंतर, वाहनाचा वेग वाढवून चालकानं तेथून पलायन केलंय. दरम्यान, आजूबाजूच्या लोकांनी तातडीनं पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचं पथक तिथं पोहोचलं. वास्तविक, सोमवारी रात्री उशिरा बांदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृषी उत्पन्न बाजाराजवळ हा भीषण अपघात झालाय.

येथे भरधाव वेगात आलेल्या वाहनानं कारला जोरदार धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच, बांदरी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रक्तानं माखलेल्या तरुणांना अथक प्रयत्नानंतर कारमधून बाहेर काढले. तद्नंतर त्यांना बांदरी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय. कारमधील तीन मित्र सागरजवळील ढाब्यावर जेवण करून गावाकडं परतत असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. कृषी उत्पन्न बाजाराजवळ मालथॉनकडून येणाऱ्या वाहनानं कारला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला.

Car Accident
'हा' चहावाला दिवसभर चहा विकून गोरगरीब, भिकाऱ्यांची भागवतोय भूक

बांदरी पोलिस स्टेशनचे (Bandri Police Station) प्रभारी धर्मेंद्र गुर्जर यांनी सांगितलं की, आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले जाता असून याद्वारे अपघात कोणत्या वाहनानं झाला, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, तीन तरुणांचा एकत्रित मृत्यू झाल्यानं गावात शोककळा पसरलीय. तिन्ही तरुण मनमिळाऊ स्वभावाचे असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय. पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Car Accident
50 हजारांहून अधिक साप पकडणाऱ्या सुरेशला नागाचा दंश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.